आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसने आश्वासनांशिवाय काहीही दिले नाही : रावसाहेब दानवे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर : भाजपने मात्र पाच वर्षांत मोठी विकासकामे केली आहेत. मात्र देशात सर्वाधिक काळ सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसने आतापर्यंत आश्वासनाशिवाय कांहीही दिलेले नाही, असा आरोप केंद्रीय नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. लातूर आणि शिरूर अनंतपाळ या दोन ठिकाणी शुक्रवारी दानवे यांच्या प्रचारसभा झाल्या त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, खा. सुधाकर शृंगारे यांची उपस्थिती होती. दानवे म्हणाले की प्रचाराच्या निमित्ताने राज्याचा दौरा केला. भाजप-शिवसेना महायुतीला २२५ पेक्षा अधिक जागा मिळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पूर्ण बहुमतातील स्थिर सरकार राज्याला मिळणार आहे. मागील पाच वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारने उल्लेखनीय विकास कामांबरोबरच जनतेचा विश्वासही संपादन करण्याचे काम केले आहे. राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विणले आहे.

बातम्या आणखी आहेत...