आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Office Ransacked After Replacement Of LS Poll Candidate

छत्तीसगड काँग्रेस मुख्यालयात गोंधळ; यूपीत राजनाथ यांना विरोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर/ देवरिया - लोकसभा निवडणुकीतील तिकीट वाटपावरून भाजप, काँग्रेस या दोन्ही पक्षांना अंतर्गत पातळीवर विरोधाचा सामना करावा लागला. काँग्रेस उमेदवार बदलण्यासाठी रायपूर कार्यालयात रविवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. देवरियामध्ये भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह आणि कलराज मिश्र यांच्या विरोधात नारेबाजी झाली. रोहतकमध्ये भाजप कार्यालयात तोडफोड करण्यात आली.

शेती एकाने कसायची, कापणी दुसर्‍याने : भाजपचे कलराज मिर्श यांना देवरियामधून तिकीट देण्यात आले आहे. त्यावर शाही म्हणाले, शेती एका कसायची आणि कापणी दुसर्‍याने. दु:ख स्वाभाविक आहे. सूर्यप्रताप शाही यांनी या मतदारसंघातून आपला दावा सांगितला होता.

खुर्च्या तोडल्या - रायपूरच्या लोकसभा मतदारसंघातून छाया वर्मा यांना तिकीट देण्याचा काँग्रेसचा इरादा होता. 8 मार्चपर्यंत त्यांच्या नावाचाच विचार होता. परंतु 13 मार्चला सत्यनारायण शर्मा यांच्या नावाची घोषणा झाली. नंतर रविवारी पुन्हा छाया वर्मा यांचे नाव जाहीर झाले. त्यानंतर कार्यकर्ते मुख्यालयात आले आणि त्यांनी तोडफोड केली.