आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Congress On Petrol Diesel Price Hike In India, Urges To Bring Petrol Diesel Under Goods And Services Tax

आमच्या काळात कच्च्या तेलाचे हेच भाव असताना पेट्रोल 35.71 रुपये प्रति लिटर होते, आम्ही असा नफा कमवला नाही -काँग्रेस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पेट्रोल-डीझेल जीएसटीमध्ये आणून तत्काळ इंधनाच्या दरात 40 टक्के कपात करा

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव घसरले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देशवासियांना दिलासा देणे अपेक्षित होते. तरीही इंधनाचे दर कमी करणे सोडून त्यामध्ये सरकारने वाढ केलीच कशी असा सवाल काँग्रेसने केला. केंद्र सरकारने इंधनावर 3 टक्के सेस वाढवून पेट्रोल आणि डीझेलच्या किमती प्रति लिटर 3 रुपयांनी वाढवल्या आहेत. ही दरवाढ 14 आणि 15 मार्चच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. त्याला काँग्रेसने तीव्र विरोध केला आहे. काँग्रेसने ही दरवाढ देशवासियांवर अन्याय असल्याचे म्हटले आहे.

इंधन जीएसटीमध्ये आणून 40 टक्के कपात करा
काँग्रेस प्रवक्ते अजय माकन यांनी शनिवारी काँग्रेस मुख्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यामध्ये बोलताना त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. "केंद्र सरकारने पेट्रोल आणि डीझेलवरील वाढीव दर तत्काळ मागे घ्यावे. तसेच इंधनाला जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) अंतर्गत आणून 40 टक्के किमती कमी करायला हव्या. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती खूप कमी झाल्या आहेत. त्या अनुषंगाने सरकारने पेट्रोल, डीझेल आणि घरगुती गॅसच्या किमती कमी कऱणे अपेक्षित होते. सरकारने आपले खिसे भरण्यापेक्षा जनतेला दिलासा द्यायला हवा होता. जगात तेलाच्या किमती आज प्रति बॅरल 35 डॉलर आहेत. तरीही आपल्या देशातील सरकार केवळ नफा मिळवून जनतेचे खिसे रिकामे करत आहे."

कच्च्या तेलाची हीच किंमत असताना काँग्रेसने पेट्रोल 35.71/ltr विकले
काँग्रेस नेते अजय माकन पुढे म्हणाले, "कच्च्या तेलाची किंमत आज 35 डॉलर प्रति बॅरल आहे. 2004 मध्ये सुद्धा अशीच किंमत होती. जून आणि जुलै 2004 मध्ये काँग्रेसची सत्ता असताना डीझेल प्रति लिटर 22.74 रुपये आणि पेट्रोल 35.71 रुपये होते. त्याच वेळी घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 281.60 रुपये होती. परंतु, आज घडीला केंद्र सरकार केवळ आपल्या फायद्यासाठी जनतेकडून 3 पट किमती वसूल करत आहे." 

बातम्या आणखी आहेत...