औरंगाबादला शनिवारी काँग्रेस / औरंगाबादला शनिवारी काँग्रेस पक्षाची दुष्काळ आढावा बैठक

मराठवाड्यासह राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने शनिवारी औरंगाबादमध्ये बैठक बोलावली आहे. खासदार अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल.

प्रतिनिधी

Oct 12,2018 08:56:00 AM IST

मुंबई- मराठवाड्यासह राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने शनिवारी औरंगाबादमध्ये बैठक बोलावली आहे. खासदार अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल.


विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, आ. बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील आदी नेते या वेळी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रमुख नेते तर मराठवाड्यातील खासदार, आमदार आणि अन्य प्रमुख नेतेही उपस्थित राहणार आहेत.

X
COMMENT