आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधी परिवाराच्या सुरक्षेत निष्काळजीपणा, प्रियंका गांधींच्या घरात जबरदस्तीने घुसले लोक आणि...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रियंका गांधी - फाइल फोटो - Divya Marathi
प्रियंका गांधी - फाइल फोटो

नवी दिल्ली - काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींच्या सुरक्षेत हलगर्जीपणा दिसून आला आहे. वृत्तसंस्थाने सोमवारी सुत्रांनुसार सांगितले की, एक आठवड्यांपूर्वी काही लोकांनी विना परवानगी प्रियंका गांधीच्या घरात फक्त प्रवेश केला नाही तर त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न देखील केला. याप्रकरणी सीआरपीएफमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरु आहे. सु्त्रांनी सांगितले की, 25 नोव्हेंबर रोजी लोधी इस्टेट येथील प्रियंका गांधी वढेरा यांच्या घरात एक कार घुसली. या घटनेला त्यांच्या सुरक्षेतेतील हलगर्जीपणा झाल्याचे पाहिले जात आहे. अलीकडेच प्रियंकांच्या संरक्षणासाठी तैनात केलेले एसपीजी (विशेष संरक्षण गट) केंद्र सरकारने काढून टाकले आहे. 

बातम्या आणखी आहेत...