गरीब आणि श्रीमंत / गरीब आणि श्रीमंत अशी दोन हिंदुस्थान करायची भाजपची रणनीती, राहुल गांधींनी धुळ्यात फुंकले प्रचाराचे रणशिंग

दिव्य मराठी वेब टीम

Mar 01,2019 07:28:00 PM IST

धुळे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने उद्योगपती अंबानींना 30 हजार कोटींची खैरात वाटली. नीरव मोदी, चौकसी, विजय मल्ल्या यांची कर्जे माफ केली, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहूल गांधी यांनी केला. मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला मात्र पाने पुसली. त्यांना दररोज 17 रूपये दिले. म्हणजेच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला केवळ साडेतीन रूपये येतील, ही शोकांतिका आहे, अशी खंत वर्तविली.

काँग्रेसचे सरकार आले तर प्रत्येक व्यक्तीच्या उत्पन्नाइतकी रक्कम त्याच्या बॅंक खात्यात जमा केली जार्इल, अशी घाेषणाही त्यांनी केली.भाजपचे सरकार गरीब अाणि श्रीमंत अशा दाेन भागात देशाची फाळणी करायला पाहत अाहे. मात्र देशाचे अशाप्रकारे दाेन भाग हाेवू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

धुळे येथे खासदार राहूल गांधी यांची जाहीर सभा शुक्रवारी झाली. राज्यातील लाेकसभा प्रचाराचा शुभारंभच राहूल गांधी यांनी या सभेतून केला. यावेळी लाेकसभेतील विराेधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे, प्रदेशाद्यक्ष अशाेक चव्हाण, विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री राेहिदास पाटील, अामदार अमरिश पटेल, बाळासाहेब थाेरात, अामदार कुणाल पाटील, अामदार सुरूपसिंग नार्इक, माजी खासदार माणिकराव गावीत, माजी खासदार डाॅ. उल्हास पाटील, संदीप पाटील, राष्ट्रवादीचे नेते राजवर्धन कदमबांडे यांच्यासह धुळे व नंदूरबार तसेच जळगाव जल्ह्यातील काॅंग्रेव व राष्ट्रवादीचे नेते उपस्थित हाेते. शहरातील स्व. इंदिरा गांधी व साेनिया गांधी यांच्या यापूर्वी सभा झालेल्या शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या मैदानावर झालेल्या या सभेत बाेलतांना खासदार राहूल गांधी यांनी भ्रष्टाचार करून देशाबाहेर पळून गेलेल्या विजय मल्ल्या, नीरव माेदी, मेहूल चाेकशी यांना पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचे मित्र म्हटले.

पंतप्रधान माेदी या भ्रष्टाचाऱ्यांना नीरवभार्इ, मेहूलभार्इ, असे संबाेधतात, असे म्हणत राहूल गांधी यांनी राफेल या लढावू विमान बनविण्याच्या प्रक्रियेचा ठेका अनिल अंबानी यांना दिला. विशेष बाब म्हणजे फ्रान्सच्या राष्ट्रपतींनीच ही बाब अापल्याला सांगितली. अनिल अंबानी यांना राफेल विमानांचा ठेका देताच 30 हजार काेटी रूपये त्यांच्या खिशात टाकले. देशाचा पैसा बुडवून परदेशात पळालेल्या भ्रष्टाचारी उद्याेगपतींचे 35 हजार काेटींचे कर्जे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी माफ केली. शेतकऱ्यांना मात्र प्रतिमाणसी साडेतीन रूपये दानात देण्याइतकी खिरापत म्हणून वाटली. अपाल्या अर्ध्या तासाच्या घणाघाती भाषणात राहूल गांधी यांनी केंद्र सरकारला अाराेपींच्या पिंजऱ्यात उभे केले. पंतप्रधान माेदी नेहमी खाेटे बाेलतात नाेटबंदीच्या काळात त्यांनी काळ्या धनाविराेधात लढार्इ असल्याचे सांगितले. मात्र सर्वसामान्य प्रामाणिक लाेकांना रांगेत उभे रहावे लागले. एकही नीरव माेदी, मल्ल्या किंवा चाेकशी रांगेत उभा राहिला नाही. त्यानंतर गब्बरसिगं टॅक्स समजला जाणारा जीएसटी अाणला. यातून लहान उद्याेग पूर्ण बंद पडले. त्यांना कर्जे मिळत नाही. माेदी सरकार मात्र मेक इन इंडिया करीत इकडे इंडिया, तिकडे इंडिया, खाली इंडिया, वर इंडिया, असे करून स्वप्न दाखवत अाहे. त्याला बळी पडू नका, असे अावाहनही त्यांनी केले. राज्यात राष्ट्रवादी काॅंग्रेससाेबत लाेकसभा निवडणूक लढविणार अाहाेत. त्यामुळे या पक्षाशी अाघाडी केली अाहे. त्यातून केंद्र अाणि राज्यातील भाजप सत्तेला उखडून फेकू, अशी अाशाही त्यांनी व्यक्त केली.

एचएएलनेच मिराज, सुखाेर्इ बनविले

हिंदुस्थान एराेनेटीक कंपनी गेल्या 70 वर्षांपासून लढावू विमाने बनवित अाहे. मात्र माेदी सरकारला याच कंपनीवर विश्वास राहिलेला नाही. एचएएलनेच अातापर्यंत मिराज, सुखाेर्इ, जग्वार, मिग विमाने बनविली अाहेत, असा दावा राहूल गांधी यांनी केला.याची यादीच एचएएलकडे अाहे. एचएएल कंपनी धुळ्यापासून जवळच नाशिकला अाहे. त्यांच्याकडे अापण माहिती घेवू शकता. मिराज, सुखाेर्इ ही लढावू विमाने कधी अनिल अंबानी यांनी बनविली हाेती का? असा प्रश्न करीत राहूल गांधी यांनी अनिल अंबानींवर सध्या 45 हजार काेटींचे कर्ज अाहे. त्याला ठेका कसा दिला, असा प्रश्नही केला.


अंबानीने कागदाचे विमान तरी बनविले का?

एकीकडे हिंदुस्थान एराेनेटीक्सने सरकारला 3 हजार काेटी रूपये परत केले. तर दुसरीकडे 30 हजार काेटी रूपयांचा ठेका अनिल अंबानींच्या कंपनीला देण्यात अाला. अनिल अंबानीने कधी कागदाचे विमान तरी बनविले अाहे का? असा सणसणीत टाेला मारत राहूल गांधी यांनी केंद्रातील भाजप सरकारला धारेवर धरले. करार हाेण्यापूर्वी 10 दिवस अगाेदर कंपनी स्थापन केली अाणि लगेच ठेका देण्यात अाला, हा काेरता प्रकार अाहे, असेही राहूल गांधी म्हणाले. माेदी स्वत:ला राष्ट्रवादी म्हणवितात. मात्र त्यांनीच एचएएलला ठेका न देता अनिल अंबानी यांना दिला. तेव्हा मेरिट लिस्टची गाेष्ट कुठे गेली हाेती. काेय्यवधी रूपयांचा फायदा अंबानींना व्हावा, हाच उद्देश यामागे हाेता.

मेड इन महाराष्ट्रच्या वस्तू दिसू द्या

केंद्र सरकारवर टीकास्त्र साेडतांना राहूल गांधी म्हणाले की, चीनची मक्तेादारी अापल्याला माेडावी लागणार अाहे. भाजप सरकारने प्रत्येक वेर्ी दाेन काेयी तरूणांना राेजगार देण्याचे अाा्वासन दिले हाेते. मात्र प्रत्यक्षात भाजप सराकार 24 तासात केवळ 425 तरूणांना राेजगार देत अाहे. त्या तुलनेत चीन हा देश मात्र 24 तासात 50 हजार तरूणांना राेजगार देताे. देशात सगळीकडे मेड इन चायनाच्या वस्तू दिसतात. ही मक्तेदारी अापल्याला माेडायची अाहे. मेड इन इंडिया अथवा मेड इन महाराष्ट्र अशा वस्तू अाता दिसल्या पाहिजे, यासाठी काॅंग्रेसचे सरकार अाल्यावर प्रयत्न करू, असेही राहूल गांधी म्हणाले.

प्रत्येकाला केवळ साडेतीन रूपये दिले

एक किस्सा सांगतांना राहूल गांधी म्हणाले की, लाेकसभेत पियूष गाेयल अर्थसंकल्प मांडत हाेते. तयावेळी अचानक भाजपच्या बाकांवरील सदस्यांनी जाेरजाेरात मेजांवर टाळ्या ठाेकायला सुरूवात केली. मी मल्लिकार्जून खर्गे यांना विचारले की काय झाले तर त्यांनी सांगितले की देशातील शेतकऱ्यांना माेदी सरकारने प्रतिदिनी 17 रूपये द्यायचा निर्णय घेतला अाहे. याचा अर्थ कुटुंबातील असस्यांच्या वाट्याला केवळ साडेतीन रूपये येतात. ही शेकांतिका सरकारने तयार केली. महाराष्टातही कर्जमाफीची घाेषणा केली. मात्र अद्याप शेतकऱ्यांना पुरेशी कर्जमाफी दिलेली नाही. भाजपची सरकारे फक् खाेटे बाेऱ्यता माहीर अाहेतअ, सा टाेलाही त्यांनी मारला.

काॅंग्रेसने दाेन दिवसात दिली कर्जमाफी

मध्यप्रदेश, छत्तीसगड अाणि राजस्थानमध्ये भाजपची सत्ता गेली. तिथे काॅंग्रेसची सत्ता अाली. निवडणूक काळात अाम्ही दहा दिवसात कर्जमाफी करू, असे सांगितले हाेते. मात्र सत्तेवर येताच काॅंग्रेसच्या तीनही राज्यातील मुख्यमंत्र्यांनी केवळ दाेनच दिवसात कर्जमाफी केली.शेतकऱ्यांना दिलासा दिला. केवळ घाेषणाबाजी करीत वेळकाढू धाेरण अवलंबले नाही, असेही राहूल गांधी म्हणाले. केंद्र व राज्यात सत्ता अाली तर शेतकऱ्यांना मान वर करता येर्इल, अशी मदत करू. राेजगार निर्मीतीतून बेराेजगारांच्या हातांना कामे देवू. महिलांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य राहील. त्याचबराेबर भाजपने जिथे गेले तिथे घृणा व द्वेष पसरविला अाहे. काॅंग्रेस ताे प्रेमाने दूर करील, हीच अामची रणनिती अाहे, असेही राहूल गांधी म्हणाले.

X
COMMENT