आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राफेल डील : राहुल गांधी म्हणाले, ओलांद यांनी मोदींना चोर ठरवले, खरे की खोटे पंतप्रधानांनीच सांगावे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राफेड डीलबाबत फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांच्या खुलाशानंतर काँग्रेस मोदी सरकारवर अधिक आक्रमक झाली आहे. ओलांद यांनी खुलासा केला की, भारत सरकारनेच त्यांना अनिल अंबानींच्या कंपनीचे नाव सुचवले होते. ओलांद यांच्या खुलाशानंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा मोदी आणि सरकारवर हल्ला चढवला. ओलांद खरं बोलत आहेत की, नाही हे मोदींनी सांगावे असे राहुल म्हणाले. दरम्यान भाजपच्या वतीने रवीशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. 
 
राहुल गांधी म्हणाले, फ्रान्सचे माजी राष्ट्रपती म्हणाले की, आमच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. आम्हाला एकच पर्याय सुचवण्यात आला होता. याचा अर्थ की ते म्हणत आहेत, भारताचे पंतप्रधान चोर आहेत. पहिल्यांदाच अशाप्रकारे एखाद्या माजी राष्ट्रपतीने देशाच्या पंतप्रधानांना चोर म्हटले आहे. मला आश्चर्य वाटते की, पंतप्रधान अजूनही गप्प आहेत. यावर ते काहीच बोलले नाही. हे कोणी सामान्य व्यक्ती बोलले नाही तर, एका देशाच्या राष्ट्रपतीने केलेला आरोप आहे. हे खरे आहे की, खोटे हे मोदींनी स्पष्ट करावे. 
 
राहुल गांधी नेमके काय म्हणाले..

#WATCH Live: Congress President Rahul Gandhi addresses the media in Delhi https://t.co/agi6fvoCzp

— ANI (@ANI) September 22, 2018

पर्रिकरांना चिमटा..

राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनाही चिमटा काढला. राहुल गांधी म्हणाले की, ज्यावेळी राफेल डीलच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये बदल करण्यात आला तेव्हा मनोहर पर्रिकर संरक्षण मंत्री होते. पण ते म्हणाले, त्यांना काहीच माहिती नाही. ते त्यावेळी गोव्याच्या फिश मार्केटमध्ये मासे विकत घेत होते. 

#WATCH: Congress President Rahul Gandhi says on #RafaleDeal, "the former Defence Minister (Manohar Parrikar) said that when the contract was changed, he didn't know about it. He was buying fish in the markets of Goa" pic.twitter.com/1y3t3Dx7jX

— ANI (@ANI) September 22, 2018

भाजपचे प्रत्युत्तर..

दरम्यान, भाजपने म्हटले आहे की, राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींसाठी अशा भाषेचा वापर केला आहे, जी कोणत्याही पक्षाच्या अध्यक्षाने वापरली नसती. केंद्रीय कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद म्हणाले की, घराणेशाहीच्या मार्गाने अद्यक्ष बनलेल्यांकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार. युपीए सरकारच्या काळातील भ्रष्टाचार, बोफोर्स घोटाळा आणि वढेरा यांच्या जमीन प्रकरणावरूनही भाजपने हल्लाबोल केला आहे. 

 

राजनाथ यांचे स्पष्टीकरण...

राफेड डीलबाबत वाद पसवण्यात काहीही अर्थ नाही. फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष ओलांद यांच्या वक्तव्याबाबत संरक्षण मंत्रालयाने म्हणे मांडले आहे. ते वक्तव्याची तपासणी करत आहे. सर्व आरोप हे निराधार आहेत, असे स्प्टीकरण केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले. 

 

 

बातम्या आणखी आहेत...