आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधी महाकालच्या चरणी, भाजपने म्हटले निवडणुकीच्या तोंडावर देवदर्शनाचे नाटक सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उज्जैन - मध्यप्रदेशात सध्या निवडणुकांचे वातावरण तापले आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या काळात उज्जैनमध्ये महाकालाचे दर्शन घेणाऱ्या राजकीय नेत्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. सोमवारी राहुल गांधींनी उज्जैन येथील महाकालाचे दर्शन घेत पुजा केली. 

 

Congress President @RahulGandhi performs Rudra Abhishek of #Mahakal Mahadev Shiv in Ujjain , #MadhyaPradesh ... pic.twitter.com/gFHWZ8APuj

— Supriya Bhardwaj (@Supriya23bh) October 29, 2018

Congress President Rahul Gandhi visits Mahakaleshwar temple in Ujjain. Madhya Pradesh Congress President Kamal Nath and Jyotiraditya Scindia also present. #MadhyaPradesh pic.twitter.com/chQlgOeSKa

— ANI (@ANI) October 29, 2018

Congress President Rahul Gandhi offers prayers at Mahakaleshwar temple in Ujjain. #MadhyaPradesh pic.twitter.com/NOxi4C0r9A

— ANI (@ANI) October 29, 2018

राहुल गांधी मध्य प्रदेशात निवडणूक प्रचाराच्या दौऱ्यावर आहेत. महाकालेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर मध्य प्रदेशात ते प्रचार दौऱ्याला सुरुवात करतील. गेल्या काही दिवसांत राहुल गांधींनी निवडणूक प्रचारादरम्यान विविध राज्यांमध्ये मंदिरांमध्ये दर्शन घेतले आहे. इंदूर सह अनेक ठिकाणी तर शिवभक्त राहुल गांधी असे पोस्टर्सदेखिल लावण्यात आले आहेत. तर दुसरीकडे भाजपने राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. भाजपवर धार्मिक राजकारणाचा आरोप करणाऱ्या काँग्रेसला आता मंदिरांमध्ये कसासाठी फिरावे लागत आहे. याआधी राहुल गांधी आणि त्यांच्या आई सोनिया अनेक वेळा मध्यप्रदेशात आले. पण मग त्यांनी तेव्हा महाकालाचे दर्शन का घेतले नाही, असा सवाल करत काँग्रेस नाटक करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.  

 

 

बातम्या आणखी आहेत...