आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Congress President Sonia Gandhi Writes Emotional Letter To Arun Jaitley's Wife Sangeeta

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी अरुण जेटलींच्या पत्नी संगीता यांना लिहिले भावुक पत्र; व्यक्त केले दुःख

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे शनिवारी दुपारी 12 वाजून 7 मिनिटांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. आज सकाळी ११ वाजता जेटली यांचे पार्थिव भाजप मुख्यालयात ठेवले जाईल. दुपारनंतर त्यांच्यावर बोधघाटावर राजकीय सन्मानात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 
 

सोनिया गांधींनी पत्राद्वारे व्यक्त केले दुःख 
दरम्यान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी जेटलींच्या निवासस्थानी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी सोनिया यांनी जेटली यांची पत्नी संगीता जेटली यांच्याकडे पत्राद्वारे शोक व्यक्त केला. सोनिया गांधी यांनी पत्रात लिहिले की, अरुण जेटली यांचे राजकारणाबाहेर नेहमीच मैत्रीपूर्व संबंध ठेवले. सोबतच त्यांच्याकडे अदम्य साहस होते. यामुळेच त्यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी गंभीर आजाराचा हिमतीने सामना केला. 
 

हे होते जेटलींचे वैशिष्ट्य
अरुण जेटली पक्षासाठी संकटमोचक होते पण विरोधी पक्ष देखील त्यांना आपलंसं मानत होते हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या निधनानिमित्त भाजप नेत्यांसमवेत इतर पक्षातील नेत्यांनी दुःख व्यक्त केले आहे.