आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरवाढीविरुद्ध १२ पंपांवर काँग्रेसची आज निदर्शने; सकाळी दीड तास पेट्रोल पंप, रिक्षाही राहणार बंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- इंधन दरवाढीविरोधात पुकारलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पदाधिकारी सोमवारी शहरातील १२ पेट्रोल पंपांवर निदर्शने करणार आहेत. सोमवारी सकाळी १०.३० ते १२.३० दरम्यान क्रांती चौक, राज, बाबा, हर्सूल यासह शहरातील प्रमुख पेट्रोल पंपांवर हे आंदोलन करण्यात येणार आहे. यात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेस शहराध्यक्ष नामदेव पवार यांनी केले आहे. महागाईविरोधात काँग्रेसने सोमवारी भारत बंद पुकारला आहे. सकाळी ९ ते ३ वाजेपर्यंत हा बंद असणार आहे. यात व्यापाऱ्यांनाही सहभाग नोंदवावा, असे आवाहन काँग्रेसने केले आहे. दीड तासाच्या निदर्शनांत विक्री बंद ठेवण्याचे आश्वासन पंपचालकांनी दिल्याचे पवार यांनी सांगितले. 


संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा
सर्वपक्षीय बंदला संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा असल्याचे प्रदेश प्रवक्ते डाॅ. शिवानंद भानुसे यांनी सांगितले. रिक्षाचालक, मालकही सहभागी होणार : परिवहन विभागाला विनंती करूनही किलोमीटरप्रमाणे दर ठरवून दिले जात नाहीत. त्यामुळे सोमवारी होणाऱ्या आंदोलनात रिक्षाचालक, मालकही सहभागी होतील, असे असे महासंघाचे अध्यक्ष निसार अहमद खान यांनी कळवले आहे. तसेच सोमवारी रिक्षा बंद ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...