आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेसोबत आघाडी करण्यास काँग्रेसची तयारी, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिले संकेत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील पाच जिल्हा परिषदच्या निवडणुकांसाठी काँग्रेस तयारीला लागली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पहिल्यापासूनच आघाडी आहे. दरम्यान सत्तेसाठी तयार झालेली महाराष्ट्र विकास आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला शिवसेनेच्या रुपात नवीन सोबती मिळाला आहे. दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेबरोबर युती करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाच्या स्थानिक युनिटला देण्यात आला आहे.



महाराष्ट्र विकास आघाडीच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाज नागपूर, अकोला, वाशिम, धुळे आणि नंदुरबारमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत. 7 जानेवारी 2020 रोजी यासाठी मतदान होणार आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित लढणार की नाही हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झाले नाही. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेबत थोरात यांनी पक्षाच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. ज्या ठिकाणी आम्ही कमकुवत आहोत त्या ठिकाणी शिवसेनेसोबत जाण्याचा विचार केला जाऊ शकतो असे पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. विशेषतः अकोल्यात वंचित बहुजन विकास आघाडीविरुद्ध लढण्यासाठी काँग्रेसला इतर मित्रपक्षांची गरज भासणार आहे.



या बैठकीसाठी आमदार के.सी.पाडवी, माजी मंत्री पद्माकर वळवी, डॉ.शोभा बच्छाव, काँग्रेस प्रदेशउपाध्यक्ष तुकाराम रेगे, नैतिक दीन खतीन, प्रदेश महासचिव गणेश पाटील, रामकिशन ओझ आदींची उपस्थिती होती. 

बातम्या आणखी आहेत...