Home | National | Other State | congress share video of rahul gandhi hugging pm on hug day and gives message

Valentine Day च्या निमित्ताने व्हायरल होत आहे पीएम मोदी आणि राहुल गांधींचा व्हिडिओ

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 13, 2019, 01:58 PM IST

काँग्रेसने सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

  • congress share video of rahul gandhi hugging pm on hug day and gives message
    नॅशनल डेस्क - जगभरात सध्या व्हॅलेनटाईन सप्ताह साजरा केला जात आहे. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काँग्रेसने 'हग डे' (गळाभेटीचा दिवस) निमित्ताने राहुल यांनी मोदींची गळा भेट घेत असल्याचा व्हिडिओ शेअर केला. तसेच भारतीय जनता पक्षावर सुद्धा निशाणा साधला. काँग्रेसने लिहिले, 'आज भाजपला आमचा थेट संदेश: 'गळाभेट घ्या, द्वेष करू नका.' हा व्हिडिओ आतापर्यंत जवळपास 60 हजार लोकांनी पाहिला असून पाहणाऱ्यांची संख्या वाढत आहे. सोबतच व्हिडिओला 15 हजार लाइक देखील मिळाले आहेत. गतवर्षी जुलैमध्ये पावसाळी अधिवेशनात एनडीए आणि विरोधी पक्षामध्ये अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू होती. त्याचवेळी राहुल गांधी आपल्या जागेवरून उठले आणि पीएम मोदींकडे जाऊन अचानक त्यांची गळाभेट घेतली. राहुल गांधींच्या स्टंटमुळे सर्वांनाच धक्का बसला होता.

Trending