आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खातेवाटपाबाबतची बैठक संपली, विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचा तर उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचा असेल- प्रफुल पटेल

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उद्धव ठाकरे उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार

मुंबई- काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांच्यात खातेवाटपाबाबतची महत्त्वाची बैठक मुंबईतील यशवंत चव्हाण सेंटरमध्ये पार पडली. 3 तास या बैठकीमध्ये चर्चा झाली. यात राज्याच्या विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे असेल तर उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे असेल.

विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसचा असेल- पटेल

बैठकीत तिन्ही पक्षाती जेष्ठ नेते होते. उद्या शिवसेना पक्षप्रमुखे उद्धव ठाकरेंचा शपथविधी होईल. तसेच, त्यांच्यासोबत नेमके किती जण मंत्रीपदाची शपथ घेणार अद्याप निश्चित झालेलं नाहीये. पण, उद्या प्रत्येक पक्षातील एक ते दोनजण मंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. तसेच, 3 डिसेंबरनंतरच मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. विधानसभा अध्यक्ष पदासाठी काँग्रेसचा उमेदवार असेल आणि उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल. तसेच, उपमुख्यमंत्रीपदावर राष्ट्रवादीचा उमेदवार असेल. बाकी सर्व तपशील उद्या कळेल, अशी प्रतिक्रीया प्रफुल पटेल यांनी यावेळी दिली.काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेसह घटक पक्षाचे नेत्यांच्या उपस्थितीती होती. या बैठकीत शरद पवार, उद्धव ठाकरे, अहमद पटेल, जयंत पाटील, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, एकनाथ शिंदे, सुनील तटकरे यांच्यासह इतर महत्त्वाचे नेते हजर होते. बैठकीत शपथविधी आणि खातेवाटपाबद्दल चर्चा करण्यात आल्याचे कळते. बैठकीनंतर मीडियाशी बोलताना, सर्व बाबींवर चर्चा झाली आहे. चिंता करण्याचे कारण नाही, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...