आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबंगळुरू - महाराष्ट्रात काँग्रेसने शिवसेनेसोबत येण्यापेक्षा भाजपला सोबत घेऊन सत्ता स्थापित करावी असा सल्ला एच.डी. कुमारस्वामी यांनी दिला. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या मते, शिवसेनेचा हिंदुत्वाचा मुद्दा भाजपच्या तुलनेत अधिक कट्टर आहे. त्यामुळे, काँग्रेसने शिवसेनेला सोबत घेणे सोडून भाजपलाच मित्र बनवायला हवे असेही ते पुढे म्हणाले. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू असताना शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्रित येऊन सत्ता स्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते कुमारस्वामी यांचा सल्ला सूचक मानला जात आहे.
एच.डी. कुमारस्वामी पुढे बोलताना म्हणाले, "मला कळत नाही महाराष्ट्रात 1/2 फर्मुल्यावर विचार केला जाऊ शकतो. तरीही काँग्रेस 1/3 असा फॉर्मुला का वापरत आहे. भाजपचा हिंदुत्वाचा मुद्दा सौम्य आहे. तर शिवसेना कट्टर हिंदुत्ववादी आहे. काँग्रेस एक कट्टर हिंदुत्ववादी पक्षासोबत हात मिळवणी करत आहे. त्यापेक्षा काँग्रेसने थेट भाजपसोबत जायला हवे. त्यांचे हिंदुत्व सौम्य आहे आणि भाजपला सोबत घेऊन सत्ता स्थापित करणे अधिक सोपे आहे."
24 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. यामध्ये एकत्रित निवडणूक लढवणाऱ्या शिवसेना आणि भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. तरीही मुख्यमंत्री पदावर एकमत होऊ न शकल्याने त्यांनी सरकार स्थापित केले नाही. यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस सुद्धा यात अपयशी ठरले आणि 12 नोव्हेंबर रोजी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. बहुमत सिद्ध करण्यासाठी 288 जागांपैकी 145 जागा हव्या आहेत. निकालानंतर भाजपला 105, शिवसेनेला 56, राष्ट्रवादीला 54 आणि काँग्रेसला 44 जागा मिळाल्या आहेत. यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित येऊन सरकार स्थापनेच्या चर्चा करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.