आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सद्य:स्थितीत काँग्रेसने बदलाची गरज समजून घ्यावी

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • पारदर्शक-निष्पक्ष निवडणुकीद्वारे अध्यक्ष आणि कार्यकारिणीची निवड करून नवीन सुरुवात करावी

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाने पुन्हा उभे राहावे या मी अलीकडे केलेल्या आवाहनानंतर थोडीशी अस्वस्थता निर्माण झाली आहे. माझे काही मित्र म्हणाले की, तुमच्याबद्दल गैरसमज होणारच होता, कारण लोक ज्यावर खासगीपणे चर्चा करत होते त्यांचा तुम्ही जाहीर उल्लेख केला. त्यामुळे बंडाचे आरोप होणार हे मी गृहीतच धरले आहे. पण मी जे म्हटले आहे ते काँग्रेस पक्षाचे आदर्श आणि मूल्ये यांच्याबद्दलची माझी निष्ठा आहे. मी आयुष्यभर राजकारण केले नाही. मी करिअर बनवणाऱ्याप्रमाणे विचार करत नाही, ते गदारोळ होईल या भीतीमुळे असे विचार मांडणे टाळतात. माझी काही मते आहेत आणि ती भारताच्या प्रगतीसाठी आवश्यक आहेत या विचारामुळेच मी राजकारणात आहे. काँग्रेस पक्ष आपला इतिहास, अनुभव आणि उपलब्ध गुणवत्तेसह सर्वसमावेशक आणि विविधतेचा सिद्धांत पुढे घेऊन जाऊ शकतो, त्यामुळे मी काँग्रेसचे समर्थन करतो. अर्थात, अलीकडे दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा खाते उघडण्यात अपयशी राहिल्याने हा दावा कमजोर होत आहे.     महाराष्ट्रात चौथ्या स्थानी राहिल्याने, हरियाणात पुरेशी मेहनत न घेतल्याने आणि कर्नाटकमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर ते लवकरच गमावल्याने तसेच अलीकडील दिल्लीच्या निकालांवरून हे स्पष्ट झाले आहे की, काँग्रेसने तत्काळ काही प्रमुख चिंता दूर करायला हव्यात, ज्या देशभरात भाजपचा प्रभावी पर्याय बनण्यात आडव्या येत आहेत. अशा वेळी जेव्हा आपण भाजपला उत्तर देण्यासाठी स्वत:ला मजबूत करायचे होते, तेव्हा राष्ट्रीय राजधानीत फक्त चार टक्के मते मिळवणे हे पराभवापेक्षाही वाईट आणि लज्जास्पद आहे. त्यापेक्षाही वाईट म्हणजे माध्यमांच्या एका वर्गामुळे काँग्रेस दिशाहीन आणि नियंत्रणहीन आहे तसेच प्रभावी राष्ट्रीय विरोधी पक्ष होण्याची आव्हाने स्वीकारण्यास अक्षम आहे, ही लोकांची धारणा मजबूत झाली आहे. स्वातंत्र्य आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या पक्षाच्या इतिहासाचा विद्यार्थी या रूपात, देशाला या पक्षाने दिलेल्या महान नेत्यांचा प्रशंसक म्हणून आणि देशभरात आपली मूल्ये पुस्तकं, भाषणं आणि लेख याद्वारे पुढे नेणाऱ्या शिपायाच्या रूपात मी काँग्रेस पक्ष टीकेचा विषय होत असल्याचे पाहू शकत नाही. माझ्या मते, देशाच्या भविष्यासाठी काँग्रेस अपरिहार्य आहे. फक्त याच पक्षाकडे देशभरातील अस्तित्व आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची क्षमता आहे.  पण सध्याच्या धारणा बदलण्यासाठी आपण सक्रियपणे काम करण्याची गरज आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी त्याची जबाबदारी घेत राजीनाम्याचा प्रस्ताव दिला होता तेव्हा त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्यांमध्ये मीही होतो. त्याचे पहिले कारण म्हणजे जबाबदारीही सामूहिक असते. दुसरे म्हणजे राहुल यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व करण्याची आणि तो मांडण्याची क्षमता आणि व्हिजन आहे, ते पक्षाला पुनरुज्जीवित करण्याची प्रक्रिया सुरू करू शकत होते, असा दृढ विश्वास पक्ष कार्यकर्त्यांत होता. ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि आपण त्यांच्या निर्णयाचा आदर करायला हवा. अनेक लोकांच्या मते, पक्षात आज जी बाहेर पडण्याची भावना आहे त्याचे कारण हे आहे की, पक्षाची संघटना राहुल यांचे मन:परिवर्तन करण्यासाठी अनिश्चित काळापर्यंत प्रतीक्षा करू इच्छिते. जर हे खरे असेल तर हे त्यांच्यासाठी किंवा पक्षासाठी योग्य आहे का? ते पुन्हा पद सांभाळण्यासाठी लवकरात लवकर तयार होणार असतील तर ते चांगले ठरेल आणि पक्ष त्यांचे स्वागत करेल हे निश्चित. पण ते पद स्वीकारण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम राहिले तर देशाच्या अपेक्षेनुसार पक्ष पुढे जावा यासाठी पक्षाला एका सक्रिय आणि पूर्णवेळ नेतृत्वाची गरज भासेल. तूर्त सोनिया गांधींना हंगामी जबाबदारी देऊन कार्यकारिणीने चांगला मार्ग काढला आहे, पण आपण अनिश्चित काळासाठी त्यांच्यावर अवलंबून राहू शकत नाही आणि त्यांच्यावर जास्त भार टाकू शकत नाही हेही स्पष्ट आहे. ते त्यांच्यासाठी आणि मतदारांसाठीही योग्य ठरणार नाही. आपण जेवढी प्रतीक्षा करू तेवढा आपली परंपरागत मतपेढी गमावण्याचा धोका वाढत जाईल. त्यामुळेच मी काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाची आणि कार्यकारिणीची निवडणूक अनिवार्य असल्याचे म्हटले होते. पक्षात या पदांसाठी स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक घ्यावी, असे माझे वैयक्तिक मत आहे. माझ्या मते, निवडून आलेल्या नेत्यासाठी पक्षाच्या संघटनात्मक आणि इतर आव्हानांना तोंड देणे सोपे असते. हायकमांडने नियुक्त केलेल्या अध्यक्षाकडे अशी वैधता नसते. माझ्या मते, पक्षात एक वास्तविक प्रतिनिधी संस्थेचे मूल्य अमर्याद असते. पक्षाच्या नशिबावर त्याचे नियंत्रण आहे अशी भावना कार्यकर्त्यांतही निर्माण होते. यामुळे पक्ष विभाजित होईल असा दावा जे लोक कररतात त्यांना मी नम्रपणे सांगू इच्छितो की, एआयसीसी आणि पीसीसीच्या दहा हजारपेक्षा जास्त कार्यकर्त्यांची भागीदारी असलेल्या निवडणूक प्रक्रियेमुळे पक्ष निश्चितच मजबूत होईल. त्यामुळे पक्षात लोकप्रिय नेतृत्व चमू उभा राहील. आजच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी काँग्रेसला बदलाची गरज समजून घ्यावी लागेल. कुणाची नियुक्ती करावी आणि कुणाला काढावे याचा अधिकार नव्या नेतृत्व चमूकडे असेल. त्यामुळे संभ्रमाची स्थिती संपेल आणि राज्यांत काँग्रेसला पुन्हा उभे करण्याची प्रक्रिया सुरू होईल. खालच्या स्तरावरील संघटना मजबूत केली जाऊ शकेल. मी अनेकदा म्हटले आहे की, काँग्रेस संपली असे म्हणणे घाईचे ठरेल. आपण हे विसरू नये की, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये यशस्वी आघाडी बनवण्यात आपण यशस्वी ठरलो आणि हरियाणात भाजपला तुल्यबळ आव्हान दिले. मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब आणि छत्तीसगडमध्ये आपली प्रभावी सरकारे आहेत. लोकसभा निवडणुकीत आपण १९ टक्के मते मिळवली आहेत. त्यामुळे ही वेळ पुन्हा सुरुवात करण्याची आहे.

शशि थरूर
माजी केंद्रीय मंत्री अाणि खासदार
Twitter : @ShashiTharo
or