आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस, समाजवादी, बसप दलितविरोधी : पासवान; पत्रकार परिषदेत विचारले 11 प्रश्‍न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काँग्रेस, बहुजन समाज पक्ष (बसप), समाजवादी पार्टी (सपा) हे पक्ष दलितविरोधी आहेत, असा आरोप लोक जनशक्ती पार्टीने केला आहे. त्याचबरोबर या पक्षांना १८ प्रश्नांची विचारणाही करण्यात आली आहे.  


लोजप प्रमुख व केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे आरोप केले. ते  म्हणाले, स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने ५५ वर्षे देशाची सत्ता भोगली. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची केवळ उपेक्षाच केली नाही, तर त्यांना लोकसभेत पराभूत केले होते. संसदेच्या केंद्रीय कक्षात मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी यांच्या तसबिरी पाहायला मिळतात. मात्र, तेथे बाबासाहेबांची तसबीर दीर्घकाळ लावू दिली गेली नाही. एवढेच नव्हे, तर त्यांच्या कार्यकाळात बाबासाहेबांना ‘भारतरत्न’द्वारे गौरवण्यातही आले नव्हते. त्यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय सुटीदेखील दिली नव्हती, असा आरोप पासवान यांनी केला.  


महत्त्वाच्या दुरुस्त्यांना काँग्रेसचा विरोध
अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीयांसाठी राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाला संवैधानिक दर्जा देणे, एससी-एसटीला पदोन्नतीत आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी संविधान दुरुस्ती विधेयकाला पारित करण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. बाबासाहेब यांचे स्मारकही बनवू दिले गेले नाही. त्यास काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप पासवान यांनी केला.  

 

दलित व्होट बँकेचा मायावतींवर आरोप 

दलित समुदायाचा केवळ व्होट बँकेसारखा वापर करण्याचे काम आतापर्यंत मायावती यांनी केले आहे, असा आरोप पासवान यांनी केला. २००७ मध्ये त्यांचे उत्तर प्रदेशात सरकार होते. तेव्हा एससी-एसटी अत्याचार प्रतिबंधक कायद्याला कमकुवत करण्याचे आदेेश दिले. यासंबंधीच्या तक्रारी दाखल करण्यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांची पुष्टी जोडणे अनिवार्य करण्यात आले होते. एससी-एसटी अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावरदेखील मायावती यांनी मौन धरले होते. त्यावरही पासवान यांनी टीका केली.  

 

 

 

बातम्या आणखी आहेत...