आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Congress Spokespersons Will Not Go To TV Talks; Congress Decision After Defeat: Boycott Calls For One Month

काँग्रेस प्रवक्ते टीव्ही चर्चेस जाणार नाहीत; पराभवानंतर काँग्रेसचा निर्णय- एक महिन्यापर्यंत वाहिन्यांवर बहिष्कार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली-लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतर पक्षाने मंथन केले. एकीकडे अध्यक्ष राहुल गांधी राजीनाम्यावर आडून होते. दुसरीकडे अनेक राज्यांतील काँग्रेस कार्यकारिणीतील मोठ्या बदलाचे संकेत मिळू लागले आहेत. काँग्रेसने आपल्या प्रवक्त्यांसंबंधी मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला गुरुवारी म्हणाले, पुढील महिन्यापर्यंत पक्षाचे सर्व प्रवक्ते टीव्ही वाहिन्यांवरील चर्चेत सहभागी होणार नाहीत. काँग्रेस नेत्यांना चर्चेसाठी आमंत्रण देऊ नये, असे आवाहन सुरजेवाला यांनी माध्यमांना ट्विट करून केले आहे. या आधी काँग्रेसने अनेकवेळा प्रसार माध्यमांवर पक्षपातीपणाचा आरोप केला होता. त्यामुळेच काँग्रेसने वाहिन्यांवर बहिष्कार घातला आहे. यापूर्वी सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही प्रवक्त्यांना टीव्ही चर्चेला जाण्यास मनाई केली आहे. 

 

अध्यक्षपद सोडल्यानंतर राहुल गांधी यांचे मन वळवण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार त्यांच्या घरी पोहोचले होते. याआधी कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनीही राहुल यांची भेट घेतली होती. कार्य समितीच्या बैठकीनंतर राहुल यांची इतर नेत्यांसोबतची ही पहिलीच बैठक होती.