आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुठे नेऊन ठेवलायं 'महाराष्ट्र माझा' याचे उत्तर 'भाजप'च्या सत्ताधारी शासनाने द्यावे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दर्यापूर  - केंद्रात आणि राज्यात सध्या सत्तेत असलेले सरकार असंवेदनशील असून, समाजातील सर्वच घटक त्रस्त आहेत. सत्ताधाऱ्यांनी गेल्या साडेचार वर्षात सर्वत्र हा:हाकार उडवला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. शेतीचे प्रश्न सुटलेले नाहीत. रोजगार मिळत नाहीत. महिलांवरील अत्याचारासह गुन्हेगारी वाढली आहे. त्यामुळे भाजप सरकारने साडेचार वर्षात केवळ थापा मारण्याचे काम केले असून, शासनाने कुठे नेऊन ठेवलाय 'महाराष्ट्र माझा' याचे उत्तर द्यावे, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे खासदार अशोक चव्हाण यांनी येथे केला. जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने शहरातील अकोट मार्गावरील मैदानात गुरुवार, दि.६ ऑक्टोबरला आयोजीत सभेत मार्गदर्शन करताना अध्यक्षस्थानावरुन खासदार चव्हाण बोलत होते. 

 

या वेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र सहप्रभारी आशिष दुवा, माजी शिक्षण मंत्री वंसत पुरके, प्रवक्ते सचिन सावंत, आमदार यशोमती ठाकूर, वीरेंद्र जगताप, आशिष देशमुख, केवलराम काळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलु देशमुख, अनंत घारड, रामकृष्ण ओझा, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, राम मानकर, पंकज मोरे, तालुका काँग्रेस कमेटीचे तालुकाध्यक्ष सुधाकर भारसाकळे, बाळासाहेब हिंगणीकर, ईश्वर बुंदेले, प्रमोद दाळू, मदन झाडे, हेमंत येवले, राम मानकर, सुनील गावंडे, डॉ. अविनाश ठाकरे यांच्यासह दर्यापूर-अजंनगाव मतदारसंघातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

 

या वेळी बसस्थानकापासून संविधान ग्रथांची पायदळ दिंडी काढत सभास्थळी मान्यवर दाखल झाले होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, इंधन, पेट्रोल, गॅस दरवाढ सर्वसामान्यांना परवडणारी नाही. अच्छे दिनचे स्वप्न दाखवून शासनाने प्रत्यक्षात सर्वसामान्यांचा भ्रमनिरास केला. या प्रसंगी आमदार वीरेंद्र जगताप, यशोमती ठाकूर यांनी भाषणातून, तर प्रास्ताविकातून तालुकाध्यक्ष सुधाकर भारसाकळे यांनी सरकारचा खरपुस समाचार घेत आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूकीत काँग्रेसला साथ देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संयुक्तरित्या सूत्रसंचालन अॅड. अभिजीत देवके, शशांक धर्माळे यांनी केले. आभार जि. प. सदस्य बाळासाहेब हिंगणीकर यांनी मानले. सभेला  नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 

 

सरकारने नोटबंदी करून सर्वसामान्यांचा केला छळ : 
शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही. सर्व यंत्रणा भाजपने ताब्यात घेतल्या. दुष्काळ जाहीर करताना नवीन नियम लावलेत. अनेक विमा योजनेत शेतकऱ्यांची लूट. नोटबंदी करून सर्वसामान्यांचा छळ या विषयांवरदेखील सभेदरम्यान मान्यवरांनी मत व्यक्त केले. 

 

निवडणुका जवळच, अलर्ट रहा : माजी मंत्री वसंत पुरके 

माजी मंत्री वसंत पुरके यांनी भाजप-शिवसेनेच्या जाहिरातीतील प्रलोभनाला बळी पडत मतदारांनी चार वर्षांपुर्वी आम्हाला घरी बसवले व निराशा करवून घेतली. आता मात्र सावध रहा. तुम्हाला अलर्ट करण्यासाठीच ही जनसंघर्ष यात्रा असून देशाची व राज्याची घडी नीट बसविण्यासाठी पुन्हा काँग्रेसला सत्तेवर आणण्याचे आवाहन केले. 
 
 

बातम्या आणखी आहेत...