आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणतात- गुंड, लुटारूही चालतील; परंतु जिंकणारे असावेत : मोदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर/भोपाळ - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी मध्य प्रदेशच्या छिंदवाडा व इंदूरमध्ये जाहीर सभा घेतल्या. छिंदवाड्यात त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्या कथित व्हिडिअाेचा उल्लेख करत सांगितले की, गुंड, चोर, लुटारू, भ्रष्टाचारी अादी सर्व उमेदवार चालतील; परंतु विजय मिळवून देणारे असावेत, असे अध्यक्ष महाेदय या व्हिडिअाेत म्हणतात. असे लाेक निवडणाऱ्यांच्या हातात मध्य प्रदेश द्यावा काय? नामदार दिल्लीत बसून असे लाेक निवडत अाहेत. मध्य प्रदेशला अशा पंजापासून वाचवायचे अाहे.

 

काही जण छिंदवाड्यातून जिंकतात व दुकान मात्र गाझियाबादेत चालवतात, असा हल्लाही मोदींनी काँग्रेसवर केला. इंदूरमध्ये राहुल गांधींवर निशाणा साधताना सांगितले की, राहुल म्हणाले- ‘मेड इन छिंदवाडा’, ‘मेड इन इंदूर’ बनेल; परंतु ज्या नेत्याला त्यांचा पक्षच गांभीर्याने घेत नाही, त्यांना अापण घ्यायचे काय? त्यांना देशातील जनताही गांभीर्याने घेणार नाही, असा मला विश्वास अाहे.

 

तुम्हाला चोर म्हणणाऱ्यानेच चाेरी केलीय; त्या चाेराचे नाव अाहे नरेंद्र मोदी : राहुल

शनिवारी राहुल गांधींनी कोरिअातील सभेत काळ्या पैशांविराेधात लढाई लढू, असे मोदींनी सांगितले हाेते; परंतु मी तुम्हास सांगताे की, तुम्ही चोरी केलेली नाही. तुम्हास चोर म्हणणाऱ्यानेच चाेरी केलीय. त्याचे नाव नरेंद्र मोदी अाहे.

 

ज्यांनी बँका लुटल्या त्यांच्याकडून ‘पै-पै’चा हिशेब मागणे गुन्हा अाहे काय? : मोदी

मोदींनी महासमुंदच्या सभेत सांगितले की, ज्यांनी बँका लुटल्या व तसे करवून घेतले, त्यांच्याकडून ‘पै-पै’चा हिशेब मागणे गुन्हा अाहे? बँका लुटून पळालेल्यांच्या जगातील काेणतीही मालमत्ता जप्त करण्याचा कायदा घेऊन अाम्ही अालाे अाहाेत.

 

मोदींचे काँग्रेसला अाव्हान : त्यांनी पात्र कार्यकर्त्यास पक्षाध्यक्ष बनवून दाखवावे
मोदींनी छत्तीसगडच्या महासमुंद येथील सभेत सांगितले की, ते (काँग्रेसी नेते) नावे माेजत अाहेत की, हे-हे अध्यक्ष बनावेत. मी सांगितले हाेते की, ५ वर्षे बनवून पाहा. एक मागासवर्गीय नेते सीताराम केसरींना यांनी अध्यक्ष बनवले हाेते; परंतु त्यांच्या जागी साेनिया गांधींना कसे अध्यक्ष बनवले गेले, हे देश जाणताेच. मी काँग्रेसला अाव्हान देताे की, त्यांनी गांधी कुटुंबाबाहेरील त्यांच्या एखाद्या पात्र कार्यकर्त्याला पक्षाध्यक्ष बनवून दाखवावे. काँग्रेसच्या ४ पिढ्यांनी देश उद‌्ध्वस्त करून टाकला. केवळ एका कुटुंबाचा विचार करणारा पक्ष देशाचे कधीच भले करू शकत नाही.   

बातम्या आणखी आहेत...