Home | National | Other State | Congress sympathizes with urban Maoists giving guns to innocent children

निष्पाप मुलांच्या हाती बंदूक देणाऱ्या शहरी नक्षल्यांना काँग्रेसची सहानुभूती- नरेंद्र मोदी

​दिव्य मराठी न्यूज नेटवर्क | Update - Nov 10, 2018, 09:07 AM IST

मी रिकाम्या हाताने कधीच बस्तरला आलो नाही, दरवेळी योजना आणल्या

 • Congress sympathizes with urban Maoists giving guns to innocent children

  जगदलपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी छत्तीसगडच्या जगदलपूरमध्ये प्रचार सभेला संबोधित केले. ते म्हणाले, ‘या आधीचे सरकार तुझे-माझे करणाऱ्या विचारांचे होते. आम्ही सबका साथ, सबका विकास या नीतीवर काम करत आहोत. मी जेव्हाही येथे आलो, काहीना काही या भागाच्या विकासासाठी घेऊन आलो. जे विकास करत नव्हते, ते नक्षली आणि माओवाद्यांचे नाव घ्यायचे. ते म्हणत की तेथे (छत्तीसगड) काहीच काम होऊ शकत नाही. मात्र आम्ही करून दाखवले. शहरी नक्षलवादी वातानुकूलित घरांत राहतात. त्यांची मुले परदेशात शिकतात.

  चांगल्या गाड्या वापरतात. मात्र तेथे बसल्या-बसल्या ते रिमोटद्वारे आमच्या मुलांच्या हाती बंदुका सोपवतात.’मोदी म्हणाले की, आतापर्यंत जेवढे पंतप्रधान झाले त्यापैकी सर्वाधिक वेळा मी बस्तरला आलो असेन. मी कधीच रिकाम्या हाताने आलो नाही. विकासाची कोणती ना कोणती योजना घेऊनच आलो. तुमच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल करणे हा त्याचा हेतू होता. तुमच्या नव्या पिढीला गरिबापासून मुक्त करायचे आहे. बस्तरमधून रोग, भूकबळी, गरिबी दूर पळवायची आहे.

  अातापर्यंत ६ वेळा छत्तीसगडला आले मोदी

  पंतप्रधान बनल्यानंतर मोदी पहिल्यांदा ९ मे २०१५ मध्ये छत्तीसगडला आले होते. त्यानंतर २१ फेब्रुवारी २०१६ मध्ये नवे रायपूर आणि कुर्रूभाठ येथे आले. त्यांनी याचवर्षी १ नोव्हेंबरला छत्तीसगड राज्याच्या स्थापना दिनी आयोजित कार्यक्रमात भाग घेतला होता. मोदी यांनी पुन्हा एप्रिलमध्ये बस्तरचा दौरा केला. त्याच महिन्यात जांजगीर-चांपाला भेट दिली.

  बस्तर-सरगुजाच्या २६ जागा महत्त्वाच्या
  २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला बस्तरमध्ये १२ पैकी ४ आणि सरगुजा संभागमध्ये १४ पैकी ७ जागांवर विजय मिळाला. यावेळी भाजपला या दोन्ही ठिकाणी कामगिरीत सुधारणा करायची आहे. त्यामुळे दोन्ही जागी मोदींच्या प्रचारसभा ठेवण्यात आल्या. त्याशिवाय सर्वाधिक २४ जागा असणाऱ्या विलासपूरमध्ये पंतप्रधान २ सभांना संबोधित करतील.

  आम्ही १८ वर्षांच्या छत्तीसगडचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करू : आता आपले छत्तीसगड १८ वर्षांचे झाले आहे. अठरा वर्षांपर्यंत घरी मुलांच्या गरजेच्या वस्तू वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. घरात १८ वर्षांचा मुलगा असो वा मुलगी त्यांच्या गरजा बदलतात. त्यांचा खर्च वाढतो. छत्तीसगड राज्य १८ वर्षांचे झाले आहे. दिल्लीत बसलेले सरकार तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. सरकारे तर यापूर्वीही होती. मात्र विकास का झाला नाही? पैसे तर आधीही होते, योजनाही होत्या, मात्र कारभार दलालांच्या हाती होता. खालपर्यंत काहीच पोहोचत नव्हते. आम्ही दलालांचा सुपडा साफ केला.

Trending