आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभा निवडणूक: तेलंगणात काँग्रेस, तेदेपा अन् डाव्यांची आघाडी, राष्ट्रपती राजवटीची मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
> आघाडीचे नेते म्हणाले की, टीआरएस आणि भाजपला हरवण्यासाठी एकत्र आलो.
> तेदेपाने पक्षाच्या 35 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा एखाद्या राज्यात काँग्रेसशी हाथमिळवणी केली.
 

हैदराबाद - काँग्रेस, तेदेपा आणि डाव्यांनी तेलंगणात विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी सोमवारी पहिल्या बैठकीनंतर राज्यपाल ईएसएल नरसिम्हन यांची भेट घेतली आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे आवाहन केले. तेलंगण राष्ट्र समिती प्रमुख आणि कार्यवाहक मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मागच्या काहीदिवसां पूर्वी विधानसभा भंग केली होती. यामुळे राज्यात डिसेंबरपर्यंत निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

काँग्रेस, तेदेपा आणि डाव्या नेत्यांचे म्हणणे आहे की, चंद्रशेखर राव राज्याचे कार्यवाहक मुख्यमंत्री आहेत. यामुळे निष्पक्ष निवडणुका होऊ शकत नाहीत. राष्ट्रपती राजवटीनंतरच राज्यात निवडणुका घेतल्या जाव्यात. तेलुगू देशम पक्षाच्या 35 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच, त्यांनी एखाद्या राज्यात काँग्रेसशी हाथमिळवणी केली आहे. टीआरए ने विधानसभा भंग केल्याच्या काही दिवसांनंतर 105 उमेदवारांची घोषणाही केली होती.

 

'टीआरएस-भाजपला हरवायचे आहे': 
काँग्रेस नेते उत्तम कुमार रेड्डी म्हणाले- "ते टीआरएस आणि भाजपला हरवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्याचा प्रयत्न करत आहेत. तथापि, अजून जागाची वाटणी होणे बाकी आहे." काँग्रेसचे तेलंगण प्रभारी आरसी खुंटिया म्हणाले- "तेदेपाशी आमची कधी कटुता नव्हती." आंध्रला विशेष पॅकेजच्या मागणीवर तेदेपा एनडीएमधून वेगळी झाली होती. नायडू यापूर्वी अनेकदा काँग्रेससोबत दिसले.

 

विधानसभा भंग: 
तेलंगणामध्ये पहिल्या विधानसभेसाठी मे 2014 मध्ये निवडणुका झाल्या होत्या. यामुळे विधानसभेचा कार्यकाळ मे 2019 मध्ये पूर्ण होतो. राव यांना वर्षाच्या शेवटी होणाऱ्या 4 राज्यांच्या निवडणुकीसोबतच तेलंगणामध्ये निवडणुका हव्या आहेत. चंद्रशेखर राव यांनी लवकर निवडणुका घेण्यासाठी 6 सप्टेंबर रोजी विधानसभा भंग केली होती. विरोधी पक्षांनी टीआरएसच्या या निर्णयाला लोकशाहीविरुद्ध असल्याचे म्हटले आहे.

 

ओवैसींनी निवडणूक टाळण्याचे केले आवाहन: 

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी इलेक्शन कमिशनला लवकर निवडणुका न घेण्याची मागणी केली आहे. ओवैसी म्हणाले की, राज्याच्या जनतेला अजून सरकार पाहिजे आहे.

 

बातम्या आणखी आहेत...