आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत कुठल्याही विरोधीपक्षाने हजेरी लावण्यास नकार दिला. मोदींनी बुधवारी देशभर लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रित घेण्याच्या विषयावर चर्चेसाठी ही बैठक आयोजित केली होती. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तसेच तृणमूल काँग्रेस अध्यक्ष ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी बैठकीवर आधीच बहिष्कार टाकला. आपचे नेते अरविंद केजरीवाल, बसपच्या सुप्रिमो मायावती यांनीही बैठकीत उपस्थित राहण्यास नकार दिला. आता काँग्रेसने सुद्धा बैठकीला दांडी मारणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, संसदेत विरोधी पक्षांच्या नेत्यांची एक बैठक झाली होती. त्यामध्येच कुठलाही नेता मोदींच्या बैठकीत सहभागी होणार नाही असा निर्णय घेण्यात आला.
ईव्हीएमवर बैठक असती तर आले असते -मायावती
बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी बैठकीत उपस्थित राहण्यास नकार दिला. यानंतर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना भाजपची फिरकी घेतील. मोदींनी ही बैठक एक देश एक निवडणूक यावर चर्चा करण्यासाठी बोलावली होती. त्यांनी ईव्हीएमवर चर्चा आयोजित केली असती तर कदाचित आपण उपस्थिती नोंदवली असती असे मायावती म्हणाल्या. केजरीवाल यांनी बैठकीत उपस्थिती लावणार नसल्याचे सांगता आपले प्रतिनिधी राघव चढ्ढा बैठकीला जातील असे स्पष्ट केले. विरोधीपक्षांनी बैठकीवर बहिष्कार टाकल्यानंतर डावे नेते त्यास हजेरी लावणार असे सांगण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.