Home | National | Other State | congress to contest all 80 Lok Sabha seats from UP, Ghulam Nabi Azad

काँग्रेसने शड्डू ठोकला, उत्तर प्रदेशात स्वबळावर लढणार; भाजपच खरा प्रतिस्पर्धी: काँग्रेस

दिव्य मराठी | Update - Jan 14, 2019, 06:14 AM IST

​​​​​​​सर्व ८० जागा लढवणार सपा-बसपा आघाडीचा परिणाम नाहीच असे आझाद म्हणाले. 

 • congress to contest all 80 Lok Sabha seats from UP, Ghulam Nabi Azad

  लखनऊ- उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्षाने काँग्रेसला बाजूला सारून लोकसभा निवडणुकीत आघाडी करण्याची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेसने शड्डू ठोकत राज्यातील सर्व ८० जागा स्वबळावर लढवण्याची घोषणा केली. काँग्रेसची थेट लढाई भाजपशी असल्याची घोषणा करून काँग्रेसचे सरचिटणीस गुलाम नबी आझाद यांनी सपा-बसपा आघाडीचा काँग्रेसवर काहीही परिणाम होणार नाही, असा दावा केला. या वेळी उत्तर प्रदेशातील निकाल आश्चर्याचा धक्का देणारे असतील, असेही ते म्हणाले. दरम्यान, राहुल गांधी या राज्यात फेब्रुवारीमध्ये १३ जाहीर सभा घेणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

  लखनऊमध्ये बैठकीनंतर काँग्रेसने आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. पक्षाचे उत्तर प्रदेश प्रभारी आझाद म्हणाले, भाजपला राष्ट्रीय पातळीवर आव्हान देण्याची शक्ती केवळ काँग्रेसमध्येच आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्षाने आघाडीचा विषयच संपवून टाकला आहे. आघाडी करण्यापूर्वी या पक्षांनी काँग्रेसशी चर्चा केली असती तर बरे झाले असते.'

  राज्यात आघाडीसाठी समाजवादी पार्टीच्या दुसऱ्या गटाशी किंवा राष्ट्रीय लोकदलाशी संपर्क साधण्यासंबंधीच्या प्रश्नाला आझाद यांनी बगल दिली. मात्र, भाजपविरुद्ध जे पक्ष काँग्रेसला साथ देतील त्या सर्वांना पाठबळ देऊ, असेही ते म्हणाले. देशातील सर्वात मोठे घोटाळे या भाजपच्या राज्यात झाले असल्याचा दावा करून भाजपला राष्ट्रहितापेक्षा आपल्या सरकारचीच चिंता अधिक असल्याचा दावा आझाद यांनी केला.

  अस्तित्व टिकवण्यासाठी विरोधकांची संधिसाधू युती : मोदी
  लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षांनी चालवलेल्या युती-आघाड्या संधिसाधू असल्याचे सांगत हे पक्ष आपले अस्तित्व राखण्यासाठी एकत्र येत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मतपेढीसाठी फोडा आणि राज्य करा' हे भाजपचे धोरण नाही. असले राजकारणही भाजप करत नाही, असे ते म्हणाले. तामिळनाडूतील भाजप कार्यकर्त्यांशी मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने संवाद साधला. या वेळी त्यांनी उपरोक्त टिप्पणी केली.

Trending