आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Congress Tweet Reaction On Narendra Modi Over Constitution Of India; Tweets Snapshot Of Amazon Receipt

काँग्रेसने ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना संविधानाची प्रत पाठवली, मोदींनी पाठवली परत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काँग्रेसने बीलचा फोटो ट्वीट केला, यात संविधानाची प्रतीची किंमत 170 रुपये आणि पेमेंट मोड 'पे ऑन डिलिव्हरी' दिसत आहे

नवी दिल्ली- काँग्रेसने आज(सोमवार) दावा केला की, पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना संविधानाची एक प्रत पाठवली, पण मोदींना यात काही रस न दाखवत ती प्रत परत पाठवली. काँग्रेसने ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचे एक बील 'रिटर्निंग टू सेलर' शेअर करत लिहीले की, पंतप्रधनांना संविधानाची एक प्रत पाठवली होती, पण त्यांनी ती परत पाठवली.


यापूर्वी 26 जानेवारीला काँग्रेसने ट्वीट मध्ये लिहीले- डिअर पंतप्रधानजी संविधान तुमच्यापर्यंत येत आहे. जेव्हा तुम्हाला देशाच्या विभाजनातून वेळ मिळेल, तेव्हा हे संविधान वाचा. जे बील काँग्रेसने शेअर केले आहे, त्यात संविधानाची एक प्रत दिसत आहे. आणित्याची किंमत 170 रुपये आणि पेमेंट मोड 'पे ऑन डिलिव्हरी' दिसत आहे.

काँग्रेसने 26 आणि 27 जानेवारीला स्क्रीनशॉट शेअर केला

काँग्रेसने या पॅकेज डिलिव्हरीच्या 26 आणि 27 जानेवारीला स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. 27 जानेवारीला जो स्क्रीनशॉट शेअर केला, त्यात लिहीले की, तुमचे पॅकेज विक्रेत्यांना पर पाठवले जात आहे. एकतर याला डिलिव्हरी अॅड्रेसवर घेण्यास नकार दिला किंवा ऑर्डर कॅन्सल केली आहे.