आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभेच्या तोंडावर काँग्रेसला उर्मिला मातोंडकरची गरज, उमेदवारांच्या प्रचारासाठी विचारणा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- लोकसभेपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेल्या उर्मिला मातोंडकरने काही दिवसांपूर्वीच अंतर्गत गटबाजींना कंटाळून पक्षाला राम-राम ठोकला. त्यानंतर काँग्रेसच्या कोणत्याच नेत्याने उर्मिलाचे नावदेखील घेतले नाही. पण, आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला परत आपल्या सेलीब्रीटी उमेदवाराची आठवण आली आहे. आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उर्मिला मातोंडकरने यावे अशी काँग्रेसची इच्छा आहे. मुंबई कांग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी उर्मिलाकडे प्रचारासाठी विचारणा केली आहे.अंतर्गत गटबाजीला कंटाळून काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या उर्मिला मातोंडकरांनी उमेदवारांचा प्रचार करावा अशी काँग्रेसची इच्छा आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी उर्मिलाकडे उमेदवारांच्या प्रचारासाठी विचारणा केली आहे. येत्या दोन दिवसात उर्मिला आपला निर्णय कळवणार असल्याचे काँग्रेसने सांगितले.

 

उर्मिलाचा काँग्रेसला राम-राम
 
लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन उर्मिलाने लोकसभेची उमेदवारी मिळवील. पण, लोकसभेत झालेल्या पराभवानंतर उर्मिला मातोंडकरने पक्षाला राम-राम ठोकला होता. लोकसभा निवडणुकीच्या काळात पक्षातील काही नेत्यांनी सहकार्य न केल्याची उर्मिला यांची भावना उर्मिलाने बोलून दाखवली होती. त्याबाबत त्यांनी पक्षाचे मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांना 16 मे रोजी पत्र पाठवले होते. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. उलट पत्रातील गोपनीय माहिती प्रसारमाध्यमांना पुरवण्यात आली. या साऱ्याचा वारंवार निषेध करूनही पक्षातील कोणीही माफी मागण्याची तसदी घेतली नाही. शिवाय, ज्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप होता, त्यांनाच जाब विचारण्याऐवजी चांगली पदे देण्यात आली, असा आरोप उर्मिला यांनी केला होता.