आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Website Article On Vajpayee News In Marathi

खासगी आयुष्यावर बोलू नका, अन्यथा नेहरू-राजीव यांची पोलखोल, भाजपचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या खासगी आयुष्यावर टीका केली तर माजी पंतप्रधान पंडित नेहरू आणि राजीव गांधी यांच्या खासगी आयुष्याची पोलखोल केली जाईल, असा इशारा भाजपने दिला आहे.
नरेंद्र मोदी यांच्या वैवाहिक स्थितीवर बोलताना भाजपने सांगितले आहे, की नरेंद्र मोदी यांनी कधीही पत्नीची माहिती लपविलेली नाही. राहुल गांधी यांनी नीट होमवर्क करायला हवे. मोदी यांनी दिलेले शपथपत्र राहुल यांनी नीट वाचायला हवे. कारण मोदींनी काहीही खोटे सांगितलेले नाही. मोदींच्या खासगी आयुष्यावर टीका केली तर पंडित नेहरू आणि राजीव गांधी यांच्या खासगी आयुष्याची माहिती जाहीर केली जाईल. यासंदर्भात सबळ पुरावे आमच्याजवळ उपलब्ध आहेत.
दुसरीकडे, भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा करिश्मा कमी करण्यासाठी कॉंग्रेसला चक्क माजी पंतप्रधान आणि भाजपचे नेते अटल बिहारी वाजपेयी यांची आठवण झाली आहे. भाजपमधील कोणत्याही नेत्याची वाजपेयींशी तुलना केली जाऊ शकत नाही, असे कॉंग्रेसच्या वेबसाईटवरील लेखात सांगितले आहे.
कॉंग्रेसच्या वेबसाईटवर अगदी ठळकपणे हा लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात वाजपेयी यांचा फोटोही लावण्यात आला आहे. गुजरातमध्ये झालेल्या दंगलींवर तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांनी काढलेले उद्गार त्यात देण्यात आले आहेत.
लेखात सांगितले आहे, की श्री वाजपेयी यांना माहित होते अपयशाचे कारण काय होते. 2002 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या दंगली रोखण्यात नरेंद्र मोदी अपयशी ठरले होते. जर मोदींवर कारवाई करण्यात आली नाही तर तेव्हाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागेल, असे त्यांचे मत होते.
पुढे सांगितले आहे, की मोदींनी राजधर्माचे पालन केले नाही याचे वाजपेयींना अतिव दुःख होते. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी त्यांच्या मुलभूत जबाबदारीचे पालन केले नव्हते. त्यांनी गुजराती लोकांचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न करायला हवा होता. जात, वंश आणि धर्माच्या नावावर लोकांमध्ये भेद करू नका, आपला राजधर्म पाळा, असे शेवटपर्यंत वाजपेयींचे मोदींना सांगणे होते.