आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान मोदींना काळे झेंडे दाखवणे पडले महागात, पोलिसांनी केली काँग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सोलापूर -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटेत कळे झेंडे दाखवणाऱ्या काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी एनएसयूआयचे गणेश दत्तात्रय डोंगरे (वय ३०, रा. रामवाडी), शुभम प्रकाश माने (वय २३, निलमनगर), निवृत्ती मनोहर गव्हाणे (वय २७, रा. दहिटणे), शिवराज शिवशंकर बिराजदार (वय २६, रा. न्यू सुनीलनगर), सिध्दराम नागेंद्र सागरे (वय २१, रा. कणबस, दक्षिण तालुका) यांच्यावर फौजदार चावडी पोलिसात तर कॉँग्रेसचे अंबादास सायबण्णा करगुळे (वय ३२, रा. फॉरेस्ट), सुभाष प्रल्हाद वाघमारे (वय ३७, रा. होटगी रोड), तिरुपती रायशम परकीपंडला (रा. अशोक चौक) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 

 

पंतप्रधान मोदी यांना काळे झेंडे दाखवून निषेध करणाऱ्या लोकांना अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसांविरुद्ध आम्ही उद्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल करणार आहोत. अॅड. असीम सरोदे, सामाजिक कार्यकर्ते 

बातम्या आणखी आहेत...