आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Congress Youth Leader Twinkle Dagre Murdered, Accused Arrested By Police In Indore

माझा कुत्रा मेला हे असे सांगून काँग्रेसच्या महिला नेत्याला पिता-पुत्राने कचऱ्यात जाळले, सुनेला चारित्र्यहीन समजत होता सासरा...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदुर- 2 वर्षांपासून बेपत्ता असलेल्या काँग्रेस नेत्या ट्विंकल डागरेचा मी खून केला आहे. आधि तिचे अपहरण केले आणि नंतर तिला घरी नेऊन मारले. नंतर टिगरिया बादशाह परिसरात मृतदेह जाळला. हा खुलासा भाजप नेता जगदीश करोतियाचा मुलगा आणि माजी एल्डरमॅन अजयने पोलिसांसमोर केला. अजयने सांगितले, त्याने ट्विंकलसोबत मंदिरात प्रेम विवाह केला होता, पण वडील तिला चारित्रयहीन समजायचे. या प्रकरणी पोलिसांनी जास्ती माहिती दिली नाहीये पण जगदीश, त्याचे तीन मुलं अजय, विजय, विनय आणि एक अन्य व्यक्ती विरोधात तक्रार दाखल करून पुढील तपास पोलिस करत आहेत. 


तर या प्रकरणी तीन नगरापलिका कर्मचाऱ्यांही शोध सुरू आहे, तर एका पोलिस कांस्टेबलवरही संशय आहे. हाय कोर्टाने पोलिसांना तीन महिन्यांच्या आता ट्विंकलला आणण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी तपासात गती आणली आणि विजयच्या नोकरांची चौकशी केल्यावर त्यांनी हत्त्येची कबूली दिली.


नाष्ता घेऊन जात होती, तेव्हा केले अपहरण
अजयने पोलिसांना सांगितले की, 16 ऑक्टोबर 2016 ला ट्विंकल घरातून नाष्ता आणण्यासाठी जात होती, तेव्ही तिला किडनॅप करून घरी नेले आणि रात्री तिचा खून केला. दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह टिगरिया बादशाह परिसरात जाळून टाकला.


त्याने सांगितले की, ते आणि त्याचे वडील मृतदेह जाळत होते तेव्हा फॅक्टरीच्या कर्मचाऱ्यांने त्यांना पाहिले, तेव्हा वडिलांनी त्याला कुत्रा मेला आहे असे सांगून हकलुन दिले. त्यानंतर नगर पालिका कर्मचाऱ्यांकडून जाळलेल्या भागात कचरा टाकून घेतला आणि आग लावली. त्यानंतर जळालेल्या कचऱ्याला नाल्यात फेकून दिले आणि त्यासोबत ट्विंकलचा मृतदेहही त्यात वाहून गेला. 
 

 

बातम्या आणखी आहेत...