आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीच्या हल्लाबोलनंतर आता काँग्रेसची संघर्ष यात्रा काढण्याची घाेषणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- भाजप सरकारविराेधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेनंतर अाता काँग्रेसनेही स्वतंत्रपणे जनसंघर्ष यात्रा काढण्याची घाेषणा केली अाहे. त्याची सुरुवात ३१ ऑगस्टला कोल्हापुरातून होणार आहे. यात्रेचा पहिला टप्पा पश्चिम महाराष्ट्रातल्या ५ जिल्ह्यांत असेल. ८ सप्टेंबर राेजी पुण्यात समाराेप हाेईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. त्यानंतर गणेशोत्सवाचे दिवस असल्याने तो संपल्यावर जनसंघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा खान्देशात सुरू होईल, असेही ते म्हणाले. 


या पत्रकार परिषदेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदम आदी उपस्थित होते. 'गेल्या चार वर्षांत भाजप सरकारने घोषणा देण्याशिवाय आणि मोजक्या उद्योगपतींचा फायदा करून देण्याशिवाय काहीही केले नाही. उलट देशातली लोकशाही धोक्यात आणण्याचेच काम या सरकारने केले. धर्मनिरपेक्षतेला धक्का लावला. सामाजिक वातावरण गढूळ केले. याविरोधात लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. भाजपच्या कारभाराची माहिती आम्ही लोकांना देणार आहोत,' असे चव्हाण म्हणाले. जाहीर सभा, पदयात्रा असे या यात्रेचे स्वरूप असेल, असे त्यांनी सांगितले. 


राहुल गांधी येणार 
"भाजपविरोधातील जनसंघर्ष यात्रेत राज्यातले सर्व प्रमुख काँग्रेस नेते, देशपातळीवरील नेते सहभागी होणार आहेत. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनीही या यात्रेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रात येण्याचे मान्य केले आहे. पहिल्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रातल्या पाच जिल्ह्यांत एक हजार किलोमीटरचा प्रवास केला जाईल,' असे अशोक चव्हाण म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...