आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साैम्यपणा आपला सद्गुण आहे, परंतु आज क्षुब्ध आहाेत...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुकेश माथुर


हातात तिरंगा, पाेस्टरवर गीतेचे श्लाेक. सीएएच्या बाजूने आणि विराेधात हाेत असलेल्या आंदाेलनांचे चित्र. आता तिरंगा हातात का घेतला यावरूनही टीका-टिप्पणी. टाेकाला पाेहाेचणारा आमचा दृष्टिकाेन. व्याकरणदृष्ट्या साैम्य शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे उग्र. साैम्यपणा हा सद्गुण आहे परंतु आम्ही आपल्या स्वभावाच्या नेमके विरुद्ध वर्तन करीत आहाेत. कदाचित हा एक टप्पा असावा, ताे निघून जाईल. नंतर आम्ही पूर्ववत साैम्य हाेऊ.

नेता-जनता, मीडिया-कलाकार, नीतिव्यवस्था, समर्थन-विराेध, विचार-प्रतीक, क्रिया-प्रतिक्रिया. प्रत्येक ठिकाणी आमच्या साैम्य स्वभावाला आव्हान मिळू लागले आहे. पंतप्रधानांनी शबाना आझमी लवकर बऱ्या व्हाव्यात अशी इच्छा व्यक्त केली. परंतु काही लाेक 'आरआयपी' लिहीत हाेते, हे आश्चर्यच म्हणावे. एक दिवस पंतप्रधान पायरीवरून घसरले त्यावरदेखील वाईट टिप्पणी करण्यात आल्या. जर तुम्ही म्हणत असाल की, अनियंत्रित साेशल मीडियामुळे समाजातील वैचारिक दृष्टिकाेनाचा अंदाज बांधू नका- तर घ्या हे उदाहरण, सीएएच्या याच आंदाेलनांमध्ये भरचाैकात काश्मीरच्या स्वातंत्र्याचे पाेस्टर आणि विटंबना करण्यात आलेली धार्मिक प्रतीकेदेखील पाहायला मिळतात.

जनतेतील साैम्यपणा लाेप पावत चालला आहे. परंतु वैचारिक व्यवहाराच्या पिरॅमिडमध्ये जाे वर असताे ताेच तर खाली झिरपत येत असताे. नेत्यांचे नारे, विधाने, विचार, वागणे सगळेच उग्र. ६ जुलै २००० राेजी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे नाराज हाेऊन दिल्लीतून परतलेल्या ममता बॅनर्जी यांचा रुसवा काढण्यासाठी काेलकात्याच्या एका झाेपडपट्टीत गेले हाेते. ममता बॅनर्जींचा पक्ष रालाेआमधून बाहेर पडणार अशी त्या वेळी चर्चा सुरू हाेती. ममतांच्या आई गायत्रीदेवी यांचे पाय धरत अटलबिहारी वाजपेयी इतकेच म्हणाले, आपली कन्या जराशी रागीट आहे. तिची वारंवार समजूत काढावी लागते.' वाजपेयी यांच्या या साैम्य वर्तनाने त्या झाेपडपट्टीत आनंदाचा जल्लाेष झाला, आणि देशाच्या राजकारणात सुलभता आली. मित्रपक्षच नव्हेत, तर विराेधकांसाेबतही हाच साैम्यभाव पाहायला मिळत हाेता. साैम्यता आणि उग्रता वरून खालपर्यंत कशी येते, त्याची उत्तम उदाहरणे अशी आहेत- एक अयाेध्या प्रकरणाचा निर्णय. पंतप्रधानांचे ट्विट आणि विराेधी पक्षांचा संयम. त्यानंतर जे घडले ते इतिहासात नाेंदवण्यासारखेच आहे. देशातील सर्वाधिक वादग्रस्त ठरलेल्या धार्मिक मुद्द्यावरील निर्णयानंतर काेट्यवधी लाेकांनी जी संयमित प्रतिक्रिया दिली तसे उदाहरण जगभरात कुठे मिळणार आहे का? दुसऱ्या बाजूला सीएएप्रकरणी सरकार आणि विराेधी पक्षांना संवेदनशीलता नकाे हाेती. द्वेषाच्या आगीत हाेरपळणारा देश त्यांना हवा हाेता. मर्यादा, सदाचार, माेेठेपणा, क्षमाशीलता अशा गुणांनी भरलेली आमची राजकीय-सामाजिक साैम्यता तिरस्काराच्या या टप्प्यानंतर परत येईल, या अपेक्षेत... अापला देश!

मुकेश माथुर, निवासी संपादक, दैनिक भास्कर, इंदौर
 

बातम्या आणखी आहेत...