आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील विविध कार्यक्रम रद्द किंवा पुढे ढकलण्यात येत आहेत. दरम्यान सांगली येथे पार पडणारे 100 वे नाट्यसंमलेन कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आले आहे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली 27 मार्चपासून हे नाट्यसंमलेन सुरू होणार होते. 27 मार्च ते 14 जून दरम्यान हे नाट्य संमेलन पार पडणार होते. कोरोना व्हायसरने जगभरात दहशत निर्माण केली आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 14 तर देशात 77 वर पोहोचली आहे.
67 वे विदर्भ साहित्य संमेलनही पुढे ढकलले
कोरोनाचा फटका राज्यातील इतरही कार्यक्रमांना बसत आहे. कोरोनामुळे 67 वे विदर्भ साहित्य संमेलन पुढे ढकलले आहे. उद्यापासून नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथे संत गाडगे महाराज महाविद्यालय परिसरात दोन दिवसांचे 67 वे विदर्भ साहित्य संमेलन होणार होते. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विदर्भ साहित्य संघाने हे संमेलन पुढे ढकलण्याचे ठरवले आहे. महिन्याभरानंतर पुन्हा हिंगणा येथे संमेलन घेतले जाण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.