आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कलायत(हरियाण)- कलायतच्या बात्तामध्ये असलेल्या अंदाजे 330 वर्षे जुन्या बाबा डेरा राजपुरीचे 14वे कथित महंतांचा आपत्तीजनक व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून ते अंडरग्राउंड आहे. गावतील लोकांचे माणने आहे की, प्रॉपर्टीसाठी हे षडयंत्र आखण्यात आले आहे. तर प्रकरणाच्या तळाशी जाण्यासाठी स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम(एसआयटी) स्थापन करण्यात आली आहे. पण जोपर्यंत बाबा किंवा व्हिडिओ बनवणारा पकडल्या जात नाही तोपर्यंत या षडयंत्राचे गुपित उलगडणार नाही.
- खास बाब म्हणजे 25 वर्षांचे ढोंगी बाबा सोमपूरी यांचे आतापर्यंत 9 व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे. एक व्हिडीओ 11 डिसेंबरला व्हायरल झाला होता, त्यात बाबा दारू आणि सिगारेट पित मुलीसोबत अश्लील चाळे करताना दिसत होते.
- व्हिडीओ व्हायरल होताच गावातील लोकांनी महापंचायत बोलवून बाबा विरूद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गावातील लोकांचा आरोप आहे की, आश्रमातील कोट्यांची संपत्ती हडपण्यासाठी कोणीतरी षडयंत्र रचले आहे.
- आश्रमात अंदाजे 350 एक्कर जमीन आहे, त्यासोबतच दर वर्षी जत्रेत लोखो रूपयांचे दान मिळते. सध्या गावातील 21 सदस्यांची समिती आश्रमाची जबाबदारी सांभाळत आहे.
- प्रकरणाच्या तपासासाठी डीएसपी जोगिंद्र सिंहच्या नेतृत्वात एसआयटीची स्थापना झाली आहे. पोलिस फक्त अंदाज लावत आहेत की, व्हिडिओ कुरूक्षेत्रच्या हॉटेलमध्ये बनवला असले, पण पक्क्या प्रमाणात नाही सांगु शकत असे त्यांचे म्हणने आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.