आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Conspiracy To Bring POK's People To The LoC By Inciting People; The Dangerous Posture Of Pakistan From Article 370

पीओकेच्या लोकांना भडकावून एलओसीवर आणण्याचा कट; कलम ३७० वरून पाकचा धोकादायक पवित्रा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कलम ३७० बाबत जगभर खोटा प्रचार करूनही अपयशी ठरलेल्या पाकने आता धोकादायक पवित्रा घेतला आहे. व्याप्त काश्मीरमधील (पीओके) लोकांना भडकावून नियंत्रण रेषेवर मोर्चा आणण्याचा पाकचा प्रयत्न आहे. दरम्यान, ही माहिती मिळताच भारतीय लष्कराने पाकला इशारा दिला आहे की, या मोर्चाच्या वेळी नियंत्रण रेषा ओलांडण्याचे दु:साहस कराल तर तत्काळ प्रत्युत्तर दिले जाईल. 

व्याप्त काश्मीरच्या लोकांचा जीव धोक्यात घालून पाकिस्तान जगाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे भारतीय लष्कराच्या सूत्रांनी म्हटले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता पसरावी म्हणून पाकचा हा प्रयत्न असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दुसरीकडे पाकिस्तानातील एक कट्टरवादी संघटना जमियत-उलेमा-ए-इस्लामने २७ ऑक्टोबरला आझादी मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.

नियंत्रण रेषेजवळ निवासी वस्त्यांवर पाक सलग तोफगोळ्यांचा मारा करत आहे. यामुळे अनेक गावांत अागीचे प्रकार घडले. पाक सैनिकांचा १५ दिवसांपासून गोळीबार सुरू असून यामुळे या भागातील नागरिक भयभीत आहेत.
 

‘जैश ए मोहम्मद’चे चार अतिरेकी दिल्लीत घुसले?
पाकमधील अतिरेकी संघटना “जैश ए मोहम्मद’चे चार अतिरेकी दिल्लीत घुसले असल्याचा इशारा गुप्तचर संस्थांनी दिला आहे. कलम ३७० रद्द केल्यानंतर बिथरलेल्या अतिरेक्यांचा सणासुदीत भारतात हल्ले करण्याचा डाव असून सुरक्षा दलांनी देशातील अनेक गेस्ट हाऊस, लॉज व हॉटेल्सवर छापे टाकले. वर्दळीच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.
 

घातपाताचा कट उघड
कलम ३७० चा बदला घेण्याची भाषा असलेले एक पत्र १० सप्टेंबरला सुरक्षा दलाच्या हाती लागले होते. यावरून भारतात मोठा घातपात करण्याचा डाव उघडकीस आला.