आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPS मुलाला गर्वाने सॅल्यूट करणार काँस्टेबल वडील; एकाच शहरात मिळाली पिता-पुत्राला पोस्टिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनौ - येथे राहणाऱ्या एका पोलिस काँस्टेबलचे आनंद मावेनासे झाले आहे. आपला जो मुलगा रोज पाया पडून आशीर्वाद घेतल्याशिवाय बाहेर पडत नाही. त्यालाच ते आता 'जय हिंद सर' सॅल्यूट करणार आहेत. विभूतिखंड पोलिस ठाण्यात ड्यूटीवर असलेले काँस्टेबल जनार्दन सिंग यांचा मुलगा IPS झाला आहे. विशेष म्हणजे, लखनौ जिल्ह्यातच मुलाला देखील पोस्टिंग मिळाली. त्यामुळे आता वडील मुलाच्या अधिपत्याखाली काम करून रोज मोठ्या गर्वाने त्याला सॅल्यूट मारतील. 

 

मुलगा म्हणे- प्रोटोकॉल पाळणार!

मुलगा म्हणाला- "वडिलांनी संस्कार शिकवले तरीही ड्युटीवर असताना प्रोटोकॅालचे पालन करेन." यापूर्वी ते गाझियाबाद, नोएडा आणि उन्नाव येथे एएसपी होते. त्यांनी इलाहाबाद विद्यापीठातून पदवी घेतली. त्यापुढील शिक्षण त्यांनी JNU मधून केले. अनूप यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी केली. पहील्याच प्रयत्नात यूपीएससी क्रॅक करून ते IPS बनले.

 

स्कॉलरशिपचे पैसे पाठवत होता घरी
वडिलांनी सांगितले, की JNU मध्ये चांगले गुण मिळवून मुलाने शिष्यवृत्ती मिळवली. घराच्या आर्थित परिस्थितीची त्याला जाणीव होती. त्यामुळे, काटकसर करून तो शिष्यवृत्तीतून मिळणारे पैसे सुद्धा घरी पाठवायचा. अशा मुलाला रोज जय हिंद करून आपली छाती गर्वाने फुगेल अशा भावना वडिलांनी व्यक्त केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...