आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपीने 2 लाख रुपये चोरी करुन दुसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन पळण्याचा प्रयत्न; पण त्यानंतर जे घडले, पाहून सगळेच आश्चर्यचकीत...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत-  वराछापरीसरात गुरुवारी रात्री 1च्या सुमारास पोलिसांना आरोपीने हुलकावणी देत इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याला पकडण्यासाठी कॉन्स्टेबल विजय राठोड यांनीही उडी मारुन आरोपीला पकडले. आरोपीला पकडत असताना त्याच्यासह राठोड यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे. दोघांना स्मीमेर हॉस्पीटलमध्ये भरती केले असून दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.

 

घटना घडल्यानंतर 9 दिवसांनी पोलिसांच्या तावडीत आले दोन आरोपी 

कापोद्रामध्ये दिवाळीच्या दिवशी एक एम्ब्रॉयडरी कारखान्यात घुसून काही लोकांनी कामगारांना बांधून दोन लाखांचे डिव्हाईस लंपास केले. पोलिसांना प्रकरणाची माहीती मिळताच त्यांनी गुरूवारी वराछा परिसरातील कोहिनूर सोसायटीमध्ये लपून बसलेल्या दोन आरोपींना पकडले.

 

हुलकावनी देऊन पळण्याचा प्रयत्न 

चौकशीदरम्यान आरोपीने सांगितल्यानुसार, त्याने पुण्यातील सुर्यनगर परिसरात श्रीजी अपार्टमेंटमधील तिसऱ्या मजल्यावर चोरीचा ऐवज लपवला होता. माहीतीनुसार पोलिस मुद्देमालाला जप्त करण्यासाठी आरोपीला घेऊन गेले. पोलिसांनी तिथुन जवळपास 6,36 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तिथे आरोपीने बाथरुमला जाण्याचे कारण सांगुन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. त्याच्या मागे उभे असलेले कॉन्स्टेबल राठोड यांनीही उडी मारुन त्याला पकडले. स्वत:चा जिव धोक्यात घालुन आरोपीला पकल्यामुळे  राठोड यांचे कौतुक होत आहे.

 

बातम्या आणखी आहेत...