Home | National | Madhya Pradesh | Constable Suicide Case Mystery in khandwa

पती-पत्नी और 'वो': बेदम मारून पत्नीची घटस्फोटाच्या कागदावर घेतली सही, त्याच पतीची 4 दिवसांनी आढळली डेडबॉडी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 24, 2018, 03:35 PM IST

पोलिसांच्या वाहन शाखेत पदस्थ कॉँस्टेबल संजय यादव यांच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे.

 • Constable Suicide Case Mystery in khandwa

  खंडवा (म. प्र.) - पोलिसांच्या वाहन शाखेत पदस्थ कॉँस्टेबल संजय यादव यांच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. बुधवारी रात्री 11 वाजता मोघट पोलिसांना शहरापासून जवळपास 15 किमी अंतरावरील जंगलात संशयास्पद अवस्थेत फासावर लटकलेला त्यांचा मृतदेह आढळला होता. गुरुवारी जेव्हा पोलिसांनी मृत संजय यांच्या पत्नीला घेऊन घटनास्थळ गाठले, तेव्हा पतीचा मृतदेह पाहून त्यांची शुद्धच हरपली. त्यांनी आरोप केला की, माझ्या पतीचे ग्वाल्हेरातील युवतीशी प्रेमसंबंध होते. प्रेयसीशी लग्नासाठी 18 ऑगस्ट रोजी संजय यांनी चुलत भावासोबत मिळून आधी मला बेदम मारहाण केली, मग घटस्फोटाच्या कागदांवर बळजबरी सह्या करायला लावल्या. यानंतर ते गायब झाले. प्रेयसीमुळेच संजयचा मृत्यू झाला आहे.

  संजय म्हणायचे- ती मला स्वप्नात दिसते, मी काय करू
  - कुटुंबीयांनीही संजय यांच्या मृत्यूला जबाबदार त्याच कथित प्रेयसीला ठरवले आहे. संजय यांचा मावस भाऊ नंदू म्हणाला, संजयचे लग्नापूर्वी युवतीशी प्रेमसंबंध होते.
  - लग्नानंतरही ती त्याला त्रास देत होती. त्याला पत्नी साधनालाही सोडायचे नव्हते, पण म्हणायचा की, त्याला नेहमी स्वप्नात ती प्रेयसी दिसते, काय करू? यानंतर त्याच्यावर उपचारही करण्यात आले, पण तो तिला विसरू शकला नाही.

  - पोलिसांच्या मते, संजयचा मृतदेह 4 दिवसांपूर्वीचा असू शकतो. फॉरेंसिक एक्सपर्टकडून तपासणी करण्यात येत आहे. पोलिसांना संजयजवळ दोन पानी सुसाइड नोटही आढळली आहे, परंतु अजून पोलिसांनी त्याचा खुलासा केला नाही.


  सुसाइड नोटमध्ये बरेच काही लिहिले आहे...
  - संजय 18 ऑगस्टसपासून बेपत्ता होता आणि शहरापासून जवळपास 15 किमी दूर टिटगांवच्या जंगलात त्याचा मृतदेह आढळला. असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, ज्यामुळे संजयच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. त्याने खरेच आत्महत्या केली की, त्याची हत्या झाली, याचा पोलिस शोध घेत आहेत.


  20 तारखेला एसपींना तक्रार
  - साधनाचे वडील रामबाबू यादव म्हणाले, संजयच्या प्रेमसंबंधांची माहिती त्याच्या घरच्यांनी आमच्यापासून लपवली होती. लग्नानंतरही तो तिच्याशी बोलत होता. 18 ऑगस्ट रोजी घरातून गेला, पण परतला नाही. 20 तारखेला एसपींना साधनाला मारहाण करून घटस्फोटाच्या अर्जावर बळजबरी सह्या घेतल्याची तक्रार केली होती.

  पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...

 • Constable Suicide Case Mystery in khandwa
 • Constable Suicide Case Mystery in khandwa

Trending