आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयाचा आदेशाला हरताळ फासून दादरच्या ‘आंबेडकर भवन’चे बांधकाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दादर येथील आंबेडकर भवनचे बांधकाम जैसे थे ठेवण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश असूनही आंबेडकर बंधुंनी येथे डागडुजी चालवल्याची तक्रार व्यवस्थापन पाहणाऱ्या द पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्टने पोलिस आयुक्तांकडे केली अाहे. मुंबई पालिकेकडे कारवाई करण्याची मागणीही केली आहे.


द पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्टचे सचिव अॅड. श्रीकांत गवारे यांनी ५ सप्टेंबर रोजी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले, न्यायालयाने आंबेडकर भवनचे पाडकाम जैसे थे ठेवण्याचे आदेश २९ जुलै २०१६ रोजी दिले. भवन परिसरात ट्रस्टी व आंबेडकर बंधू यांना प्रवेशास मनाई आहे. असे असूनही तेथे डागडुजी सुरू आहे. तरी न्यायालयाच्या आदेशाच्या भंग प्रकरणी आंबेडकर बंधूंवर कारवाई करावी. द पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्टने पालिकेच्या एफ दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त यांच्याकडे २० आॅक्टोबर रोजी तक्रार दिली आहे. यासंदर्भात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष व बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज यांनी आपण भवनचे कोणतेही काम पाहत नसल्याचे सांगितले. त्यांचे दुसरे बंधू भीमराव म्हणाले, भवनात बांधकाम चालू नसून डागडुजी करत आहोत. त्याला पालिकेच्या परवानगीची गरज नाही. डागडुजीचा निर्णय ३ ट्रस्टींनी एकत्रित घेतला. त्यापैकी मी एक आहे. २ वर्षे थंड असलेला आंबेडकर बंधू व ट्रस्टी यांच्यातला बांधकामासंदर्भातला वाद पुन्हा उभा राहण्याची चिन्हे दिसत आहेत.


१७ मजली सामाजिक केंद्र  
बाबासाहेबांनी १९४४ मध्ये ही जागा सामाजिक कार्यासाठी घेतली होती. १९७३ मध्ये या जागी छोटी इमारत बांधली. पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्टीचे ६० कोटी खर्च करून इथे १७ मजली सामाजिक केंद्र बांधण्याचे नियोजन आहे. सरकारी खर्चातून इमारत बांधण्यास आंबेडकर बंधूंचा विरोध आहे. ट्रस्ट आणि आंबेडकर बंधू यांच्यातला वाद सध्या मुंबई उच्च न्यायालयात आहे.

बातम्या आणखी आहेत...