आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अक्षयतृतीया किंवा रामनवमीला राममंदिराच्या उभारणीला सुरूवात - गोविंदगिरी स्वामी महाराज

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • राममंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांत महाराष्ट्राचे स्वामी गोविंददेव गिरी यांचा समावेश आहे
  • राममंदिर ट्रस्ट स्थापन केल्याची मोदींनी संसदेत दिली होती माहिती

पुणे - अयोध्येत अक्षयतृतीया अथवा रामनवमी दिवशी राममंदिराच्या उभारणीला सुरूवात होण्याची शक्यता असल्याचे राममंदीर ट्रस्टचे न्यासचे सदस्य गोविंदगिरी स्वामी महाराज यांनी सांगितले. पुणे येथे एका कार्यक्रमाला आले असता ते यावेळी म्हणाले. यावेळी बोलताना म्हणाले की, मंदिराची सर्व संरचना तसेच मंदीरासाठी लागणाऱ्या पाषाणाचे कोरीव काम पूर्ण झाले आहे. यामुळे राममंदिर उभारणीचे काम वेगाने पुर्ण होईल. दरम्यान शासनाने ट्रस्ट निर्माण केल्याने शासनच ट्रस्टचे रक्षक आहे, असेही ते म्हणाले. राममंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांत महाराष्ट्राचे स्वामी गोविंददेव गिरी यांचा समावेश आहे. ते रामायण, भगवद्गीता, महाभारत व इतर पौराणिक ग्रंथांचे प्रवचन करतात. गोविंददेव गिरी हे आध्यात्मिक गुरू पांडुरंगशास्त्री आठवले यांचे शिष्य आहेत. ​​​​​​पंतप्रधान मोदींनी राममंदिर ट्रस्ट स्थापन केल्याची संसदेत माहिती 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राममंदिरासाठी ट्रस्ट स्थापनेची घोषणा बुधवारी केली. केंद्रीय मंत्रिमंडळाने ट्रस्ट स्थापनेस मंजुरी दिल्यानंतर मोदींनी लोकसभेत याची माहिती दिली. ट्रस्टचे नाव ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ असे असून दिल्लीच्या ग्रेटर कैलाशमध्ये कार्यालय असेल. ट्रस्टच अयोध्येत राममंदिराची उभारणी व संबंधित निर्णय घेणार असल्याचे मोदी म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...