आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शरीरातील अनेक महत्त्वाच्या गोष्टींमध्ये प्लेटलेट्सदेखील तितकाच महत्त्वाचा भाग आहे. अनेकदा तुम्ही प्लेटलेट्स कमी झाल्या असं ऐकलं असेल, पण हे प्लेटलेट म्हणजे काय जाणून घ्या. डेंग्यू तापादरम्यान शरीरात प्लेटलेट्सची मात्रा कमी होऊ लागते. याला वाढवण्यासाठी तुमच्या आहारात या पौष्टिक तत्त्वांनी युक्त पदार्थांचा समावेश करा.
हिमोग्लोबिन, प्लाझ्माप्रमाणे प्लेटलेट्स हादेखील रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहे. रक्त पातळ होऊ न देण्याचं तसंच रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचं काम या ‘प्लेटलेट्स’ करतात. या प्लेटलेट्स मुळातच एखाद्या प्लेटप्रमाणे दिसतात. त्यामुळे त्यांना ‘प्लेटलेट्स’ हे नाव शास्त्रज्ञांनी दिलं आहे. या पेशींसाठी वैद्यकीय भाषेत ‘थ्रोम्बोसाइट्स’ ही संज्ञा वापरली आहे.
लाल पेशी (आरबीसी), पांढऱ्या पेशी (डब्ल्यूबीसी) आणि प्लेटलेट्स (तंतुकणिका). त्यापैकी रक्तामध्ये ‘प्लेटलेट्स’ची संख्या सर्वाधिक असते. प्लेटलेट्स या मोठ्या हाडांतील रक्तमज्जेत (रेड बोनमॅरो) असणाऱ्या मेगा कॅरोसाइट्स या पेशींपासून तयार होतात. त्यांचं रक्तातील आयुष्य सर्वसाधारणपणे ५-९ दिवसांचं असतं. जुन्या झालेल्या प्लेटलेट्स प्लीहा (स्टीन) आणि यकृत (लिव्हर) यामध्ये नाश पावतात.
रक्तवाहिन्यांतून वाहणारं रक्त हे प्रवाही राहणं महत्त्वाचं असतं. ऑक्सिजन वहनाचं प्रमुख कार्य रक्तातून होतं. तसंच रक्त शरीरातील विभिन्न अवयवांचे पेशीस्तरांवर पोषण करते. एखादी जखम झाल्यास रक्तवाहिन्यांमधून रक्त अधिक प्रमाणात वाहून गेल्यास जीवितहानीदेखील होऊ शकते. अशा वेळेस जखम झालेल्या ठिकाणी प्लेटलेट्स आणि फायबर एकत्र येऊन रक्तप्रवाह खंडित करण्याचं काम करतात. त्यामुळेच प्लेटलेट्सना ‘मानवी शरीराची कवचकुंडलं’ म्हटलं जातं.
सर्वसाधारणपणे मानवी शरीरातील प्लेटलेट्सची संख्या दीड ते साडेचार लाख इतकी असते. संख्या प्रमाणापेक्षा अधिक झाल्यास रक्ताची गुठळी होऊन रक्तवाहिन्यांतील रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक यासारखे आजार होतात. हातापायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास शरीराचा तो भाग बधिर होऊन निकामी होऊ शकतो. संख्या प्रमाणापेक्षा कमी झाल्यास रक्तस्राव अधिक होतो. म्हणजे नाकातून, हिरड्यांमधून, थुंकीतून रक्त पडतं. त्वचेवर लालसर ठिपके येतात. मासिक रजस्राव अधिक प्रमाणात होतो. जास्त रक्त गेल्याने थकवा येतो.
- डेंग्यू, मलेरियाचा ताप - अानुवंशिक आजार - केमोथेरपी
संख्या कमी झाल्यास.. : डेंग्यू, मलेरिया या साथीच्या तापात प्लेटलेट्सची संख्या अचानक कमी होऊ शकते. त्यामुळे २-३ दिवसांचा ताप आल्यास, त्या रोगांची लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ल्याने त्वरित रक्ततपासणी (सीबीसी टेस्ट) करून घ्यावी. त्यानुसारच उपाययोजना करावी.
१. अँटिऑक्सिडेंट : खाण्याच्या काही पदार्थांमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी आिण अँटिआॅक्सिडेंट असते. याच्या सेवनामुळे रक्तातील प्लेटलेट्सची संख्या वाढते. अॅँटिऑक्सिडेंट्स नुकसानदायी रेडिकल्सनाही निष्क्रिय करण्यास मदत करते. म्हणून हिरव्या पालेभाज्या, कडधान्य आिण बीन्स जास्त खा.
२. व्हिटॅमिन के : व्हिटॅमिनचे भरपूर प्रमाण असलेल्या पदार्थांच्या सेवनामुळे रक्तातील प्लेटलेट्स खूप वेगाने वाढतात. यामुळे रक्तातील गाठी होत नाहीत. यासाठी पत्ताकोबी, ब्रोकली, बीट आिण अंडी अधिक खावे.
३. फोलेट : शरीरात फोलेटच्या कमतरतेमुळे प्लेटलेट्सची संख्या कमी होऊ लागते. म्हण्ून आहारात फोलेटचे भरपूर प्रमाण असलेल्या पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला देतात. याच्या योग्य प्रमाणासाठी शतावरी, डाळी, राजमा, सुकामेवा आणि पालक आदींचा समावेश करा
४. व्हिटॅमिन सी : निरोगी मनुष्याला दररोज ४०० ते २००० मिग्रा व्हिटॅमिन सीचे सेवन करायला पाहिजे. प्लेटलेट वाढवण्याशिवाय हे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि त्वचा, केसांसाठी फायदेशीर आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.