आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Consumer Forum Fined 25 Thousand Rupees Penalty On Inox Cinema For Charging Extra Money

चित्रपटगृहात पाणी बॉटलसाठी आकारले 50 रुपये, ग्राहक मंचाने आयनॉक्स सिनेमाला ठोठावला 25 हजारांचा दंड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - चित्रपटगृहात पिण्याच्या पाण्याची बॉटल एमआरपीपेक्षा जास्त दराने विकल्याप्रकरणी जिल्हा ग्राहक मंचाने आयनॉक्स सिनेमाला 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. सुरेंद्र सिंह यांनी याप्रकरमी ग्राहक मंचात तक्रार दाखल केली होती. मंचाचे अध्यक्ष नगेंद्र पाल भंडारी यांनी याप्रकरणी निर्णय दिला. 

तक्रारदार सुरेंद्र सिंह 2016 मध्ये क्रिस्टल पॉम मॉल येथील आयनॉक्स सिनेमागृहात चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. चित्रपटगृहात त्यांच्याकडून एक लिटर पाण्याची बाटलीसाठी 50 रुपये आकारले. हीच बाटली बाजारात सर्व करांसह 20 रुपयांत मिळते. याप्रकरणी चित्रपटगृहाने बाहेरून खाद्यपदार्थ व पेय आणण्यास बंदी केली आहे आणि ग्राहकांना जास्त दराने पाण्याची विक्री करत असल्यामुळे ते याप्रकरणी दोषी असल्याचे ग्राहक मंचाने म्हटले आहे.