• Home
  • Business
  • Consumers will be able to purchase like Amazon, Flipkart on the government's 'Gem' e commerce platform

GeM / सरकारच्या ‘जेम’ ई-काॅमर्स प्लॅटफाॅर्मवर अॅमेझाॅन, फ्लिपकार्टसारखी खरेदी करणे ग्राहकांना हाेणार शक्य

प्लॅटफाॅर्मवर सध्या सरकारी विभाग, सार्वजनिक उपक्रमांना खरेदीची मुभा

Aug 23,2019 09:05:00 AM IST

नवी दिल्ली - आता लवकरच सरकारी ई-काॅमर्स प्लॅटफाॅर्मवर खरेदी करता येऊ शकणार आहे. सरकार हा प्लॅटफाॅर्म सर्वसामान्य जनतेसाठी खुला करत आहे. त्यामुळे अॅमेझाॅन आणि फ्लिपकार्टप्रमाणे ग्राहक गव्हर्नमेंट ई- मार्केटप्लेस (जेम) अर्थात सरकारी ई-काॅमर्स मंचावरून आपल्या ऑर्डर देऊ शकतील. सध्या या फ्लॅटफाॅर्मवरून सरकारी विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना खरेदी करता येऊ शकते.


जेमवर १० लाखांपेक्षा जास्त उत्पादने : जीईएम हा एक सरकारी ऑनलाइन प्लॅटफाॅर्म असून त्यावर काेणत्याही प्रकारचे सामान आणि सेवा प्रदान करण्यासाठी एका माध्यमाची भूमिका बजावते. २०१६-१७ मध्ये स्थापना झाल्यानंतर या प्लॅटफाॅर्मवर विक्रेते आणि खरेदीदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. सध्या या प्लॅटफाॅर्मवर ३७ हजारपेक्षा जास्त खरेदीदार आणि २.५ लाखांपेक्षा जास्त विक्रेते आणि सेवांची नाेंदणी झाली आहे. या प्लॅटफाॅर्मवर १० लाखांपेक्षा जास्त उत्पादने आणि १३ हजारपेक्षा जास्त सेवा उपलब्ध आहेत. पहिल्या वर्षी या प्लॅटफाॅर्मवरून ४२० काेटी रुपयांच्या ऑर्डर देण्यात आल्या. दुसऱ्या वर्षी त्या वाढून ६ हजार काेटी रुपयांवर गेल्या.


तिसऱ्या वर्षात २०१८-१९ मध्ये जीईएमवर एकूण ३२ हजार काेटी रुपयांच्या ऑर्डर आल्या. वित्तवर्ष २०१८-१९ मध्ये या पाेर्टलवर जवळपास १७ हजार काेटी रुपयांचे व्यवहार झाले. जीईएमने या वर्षी एक लाख ऑर्डरपर्यंत पाेहोचण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.


प्लॅटफाॅर्मवर बिझनेस टू कन्झ्युमर पर्याय मिळेल :

या याेजनानुसार ग्राहक आणि व्यावसायिक या प्लॅटफाॅर्मवर नाेंदणी असलेल्या कंपन्यांकडून उत्पादने खरेदी करू शकतील. आतापर्यंत बी२बी असलेली रिटेल सुविधा उपलब्ध हाेती. त्यामध्ये आता बी२सी हा नवा पर्याय असेल.

X