आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्कलकोटजवळ कारची कंटेनरला धडक; तीन ठार, एक जण जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्कलकोट  - सोलापूर-अक्कलकोट रस्त्यावरील रिलायन्स पेट्राेलपंजावळ रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कार व कंटेनरचा अपघात होऊन कारमधील तीन जण जागीच ठार झाले, तर एक जखमी झाला. नूर महंमद गैबी शेख (वय ४५, रा. पुणे) महेबूब हसनअली शेख (५०, रा. मुंबई), दिनेश सोनार (३६, रा. मुंबई) अशी मृतांची नावे अाहेत. तर, श्रवण ब्रिजेश हरीयन (२०, रा. मुंबई) हे जखमी झाले. 

नूर मोहंमद यांची सातनदुधनी (ता. अक्कलकाेट) येथे शेती आहे. ती बटईने दिलेली आहे. शनिवारी रात्री दहा वाजता मित्राची झायलाे व इर्टिगा अशा दाेन कार घेऊन ते मुंबईहून सातनदुधनी येथील शेताकडे येण्यासाठी निघाले हाेते. झायलो गाडीमध्ये क्लीनर साइडला मेहबूब शेख बसले होते. त्यांच्या पाठीमागे श्रवण व दिनेश सोनार हाेते. नूर महंमद शेख हा गाडी चालवत होता. तर, इतर तिघे इर्टिका गाडीत हाेते. रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अक्कलकोटच्या अलीकडे पेट्राेलपंपाजवळ समाेर असलेल्या भरधाव कंटेनरने अचानक ब्रेक मारले, त्यामुळे झायलाे कार कंटेनरच्या पाठीमागील बाजूस धडकली. यात कारचा पुढील भाग चक्काचूर झाला व तिघांचा मृत्यू झाला. कंटेनरचालक बाळू शिवाजी मोराळे (वय ४६, रा. पुणे) याच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.