आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक - शहरात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू झाल्यानंतर ठिकठिकाणी गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. शहरातील बहुतांश भागात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने रहिवासी हवालदिल झाले आहेत. पावसाळी रोगट वातावरणातच गढूळ पाण्यामुळे रोगाचा प्रसार अधिक होत आहे. वडाळागाव, भारतनगर, मेहबूबनगर, सादिकनगर आदी भागात अस्वच्छतेसह काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा झाल्याने नागरिकांना साथीच्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे.
शहरात ठिकठिकाणी गढूळ पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार बहुतांश रहिवाशांनी नगरसेवकांकडे केली होती. जुने नाशिक, इंदिरानगर, विनयनगर, जयदीपनगर, सातपूर, सिडको, पंचवटी भागात गेल्या पंधरा दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. या भागातील ड्रेनेजमधून पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन गेल्याने हा प्रकार सुरू झाला आहे. या पाण्यामुळे स्थानिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. शहरातील वडाळागाव, भारतनगर, मेहबूबनगर, सादिकनगर आदी भागात अस्वच्छतेसह काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा झाल्याने नागरिकांना साथीच्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे.
या भागातील अनेक नागरिकांना थंडी-ताप, जुलाब, कावीळ अशा आजारांनी त्रस्त झाला आहे. या नागरिकांना जिल्हा रुग्णालयासह महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
साथीच्या रुग्णांसह काविळीच्या रुग्णांत वाढ
काही दिवसांपासून वडाळागाव परिसरात होणारे दूषित पाणीपुरवठ्यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे साथीच्या रुग्णांसह काविळीच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. वडाळागाव, भारतनगर, मेहबूबनगर, सादिकनगर आदी भागात साथीच्या रुग्णांसह काविळीचे रुग्ण आढळले आहेत. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात उलट्या, जुलाब, टायफॉइड, अतिसार, अचानक ताप येणे अादी विकारांचे गेल्या महिनाभरात तब्बल सात हजार रुग्ण उपचारांसाठी दाखल झाले आहेत. यात सर्वाधिक संख्या कावीळ आणि टायफॉइडच्या रुग्णांची आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.