आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंटेनरने दुचाकीला उडवले, २ बहिणी ठार; शेलवड फाट्याजवळ अपघात, आई-मामा बचावले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोदवड- शेलवडहून येणारा मोटारसायकलस्वार ओव्हरटेक करीत असताना समोरून भरधाव येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवर बसलेल्या चिमुकल्या दोघी बहिणी कंटेनरखाली चिरडल्या गेल्या. ही घटना शेलवड फाट्याजवळ शुक्रवारी सायंकाळी घडली. 


शेलवड येथून पवन कडू सुकाळे (वय २२) हा बहीण मनीषा दशरथ निकम व दोन भाच्या अनन्या-अन्वी यांना घेऊन शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता भानखेडा येथे मोटारसायकल (एम. एच. १९, ८४०४) ने जात होता. शेलवड फाट्याजवळ ओव्हरटेक करीत असताना बोदवडकडून येणाऱ्या भरधाव कंटेनरने मोटारसायकलला धडक दिली. यात पवन व मनीषा हे दोघे भाऊ बहीण बाजूला फेकले गेले. मात्र, अनन्या दशरथ निकम (वय ५) व अन्वी दशरथ निकम (वय ३) या दोघी बहिणी कंटेनरच्या मागील चाकाखाली आल्याने जागीच ठार झाल्या.तर दोन्ही मुलींची आई व मामा अर्थात दोघे भाऊ -बहिण जखमी झाले. घटनेनंतर कंटेनर चालक पसार झाला असून कंटेनर बोदवड पोलिस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले आहे. दोघी बहिणींवर भानखेडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी अज्ञात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

बातम्या आणखी आहेत...