व्हिडिओ डेस्क - निवडणूक लढणारा प्रत्येक उमेदवार हा जनतेची सेवा, विकास आणि लोकांना सुरक्षा देण्यासह दिवसरात्र त्यांच्याबरोबर उभे राहण्याचे आश्वासन गेत असतो. पण गेल्यावर्षी यूपी विधानसभा निवडणुकीत उभा राहिलेला एक उमेदवार असाही होता ज्याचे बोलणे ऐकूण तुम्हाला धक्काच बसू शकतो. पण त्याचे म्हणणे पूर्णपणे ऐकल्यानंतर तुम्हाला असे वाटेल की, त्याच्यापेक्षा खरा आणि प्रामाणिक उमेदवार तुम्ही कधीही पाहिला नसेल.
युपीच्या आगरामधून दक्षिण विधानसभा मतदारसंघातून चौधरी गोपाल सिंह धाकड निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. गोपाल यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मीडियाशी चर्चा केली होती. त्यावेळी ते म्हणाले होते, जर मी निवडणूक जिंकलो तर खूप भ्रष्टाचार करेल, स्वतःचे घर भरेल. एक व्यक्ती लोकांना मूर्ख बनवून पंतप्रधानम बनू शकतो तर मीही लोकांना मूर्ख बनवणार. पैसे कमावणार. पत्रकारांनी पैसे कसे कमावणार विचारले तर हा व्यक्ती म्हणाला, विकास कार्यांमध्ये 25 टक्के कमिशन तर मिळतेच. आणखी जास्त पैसे कमावण्याचे मार्ग मला सध्या माहिती नाहीत. निवडणूक जिंकल्यावर मला ती अक्कलही येईल.
धाकड असेही म्हणाले की, पैसे कसे कमवायचे हे मला अधिकारीच सांगतील. मी आप्तेष्टांचा सल्ला घेईल आणि भरपूर पैसा कमावेल. जेव्हा देशाचा पंतप्रधान लोकांना मूर्ख बनवू शकतो तर मी का नाही. माझ्याकडे निवडणुकीसाठी दुसरा कोणताही मुद्दा नाही. मी फक्त पैसे कमावणार आहे. गोपाल सिंह यांच्यावर दरोडा आणि हत्येचा खटलाही सुरू आहे.