आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाक व अतिरेक्यांची सलामी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
26 मे रोजी पंतप्रधानांचा शपथविधी होणार आहे. नवाज शरीफ यांच्यासहित सार्क देशांच्या प्रमुखांना आमंत्रण गेले तेव्हा इतर सर्व राष्ट्रप्रमुखांनी ताबडतोब आपला होकार कळवला. मात्र, शरीफांना आपल्या लष्करप्रमुखांची परवानगी घ्यावी लागली. त्यासाठी त्यांना चार दिवस थांबावे लागले आणि परवानगी मिळावी म्हणून नवाज शरीफ यांचे धाकटे बंधू, पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री, शाहबाज शरीफ यांना पाक लष्करप्रमुखांकडे रदबदली करावी लागली. तेव्हा कुठे परवानगी मिळाली. या सर्व गदारोळात आणखी एका गोष्टीची भर पडली आहे ती म्हणजे ज्या चार सैनिकांची डोकी पाक सैन्याने मागील वर्षी कापून नेली होती, त्यापैकी एक शहीद स्व. हेमराज यांच्या विधवा पत्नीने भारतात येताना माझ्या पतीचे शिर घेऊन या अशी मागणी केली आहे. एकूणच ‘शहीदों की विधवायें माफ नहीं करेगी’ या वाक्याचा सामना नमोंना जळीस्थळी, काष्ठीपाषाणी, सर्वत्र करावा लागणार असे दिसते. सध्या तरी पाक सरकार व अतिरेक्यांनी नमोंना शपथविधीपूर्वीच सलामी दिली आहे.