आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तासनतास टीव्ही पाहणेे ठरेल धोक्याचे; कोलंबिया विद्यापीठाच्या संशोधनातील माहिती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - काम करताना तासनतास बसणे तुमच्या हृदयासाठी तितके धोकादायक नाही पण तासन््तास टीव्हीसमोर बसणे धोकादायक ठरू शकते .कोलंबिया विद्यापीठात झालेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. सतत टीव्ही पाहण्यामुळे हृदयविकाराने मृत्यू ओढवू शकतो, असा निष्कर्ष संशोधनात काढण्यात आला आहे. मात्र सहजसोपी आसने करण्यापासून थोडी अवघड आसने करण्याने विनाकारण टीव्ही पाहत बसण्याने येणारा संभाव्य धोका टाळता येऊ शकतो. 


संशोधक कीथ एम. डियाझ यांनी सांगितले, कार्यालयात कामाशिवाय जितका वेळ तुम्ही बसता त्याने हृदयावर परिणाम होऊ शकतो. नियमित व्यायाम करण्याने हृदयविकार व त्यामुळे होणारा मृत्यूचा धोका टाळता येतो. 

 

कीथ यांनी साडे आठ वर्षे संशोधन करताना ३५९२ लोकांना  सहभागी करून घेतले होते. सर्वांना टीव्ही पाहण्याने व कार्यालयात काम करताना  आणि साध्या व्यायामाबद्दल प्रश्न विचारले होते. ज्या लोकांनी दिवसातून चार तासांहून अधिक काळ टीव्ही पाहिला, त्यांना हृदय विकाराने होणाऱ्या मृत्यूचा धोका दोन तास टीव्ही पाहणाऱ्यांच्या तुलनेत ५० टक्के अधिक होता. तर कार्यालयात बैठे काम करणाऱ्यांत हा धोका कमी वेळ काम करणाऱ्या लोकांइतकाच होता. संशोधनात व्यायाम न करणाऱ्या २०५ लाेकांचा मृत्यू झाला यात १२९ हृदय विकाराने मृत्यू झाल्याचे दिसून आले. 

 

आरामात बसण्याची सवयच धोक्याची

कीथ यांचे सहकारी संशोधक जेनेट गार्शिया यांनी म्हटले, टीव्हीप्रेमी या आजाराने ग्रस्त असणे याला कारणही त्यांच्या स्वत:च्या सवयी आहेत. नेहमी लोक सर्व काम संपल्यानंतर टीव्ही पाहणे पसंत करतात. तोपर्यंत त्यांचे जेवणही भरपेट झालेले असते. आणि आरामशीरपणे पलंगावर, कोचवर लोळत आवडीचे कार्यक्रम पाहात असतात. भरपेट खाऊन तासन््तास बसणे आरोग्यासाठी धोकादायक असते, याची सर्वांना कल्पना आहे. तर काहीजणांना फळांऐवजी स्नॅक्स खाणे त्यांना आवडते. हे आरोग्यदायी नाही. 

बातम्या आणखी आहेत...