आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुरशीयुक्त शेवयाप्रकरणी कंत्राटदार काळ्या यादीत; विभागीय अायुक्तांची पत्रकार परिषदेत माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागामार्फत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या बुरशीयुक्त शेवयाप्रकरणी संबधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश दिले अाहेत. या पदार्थांचे नमुने तपासणीस पाठवण्याच्या सूचना करण्यात अाल्याची माहिती विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी पत्रपरिषदेत दिली. माने यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेत मागील दोन वर्षांच्या प्रशासकीय अहवालाचे वाचन व आढावा घेतला. यात काही झालेल्या चांगल्या कामांचे कौतुक केले आहे. 


यात कुपोषण, आरोग्य, खात्यामार्फत चांगली कामे झाली आहेत. घरकुलेही पुरेशी पूर्ण झाली आहेत. ग्रामीण पाणीपुरवठा, लघुसिंचन, ग्रामपंचायतीमधील अपहार, वसुली याबाबतच्या त्रुटी अद्याप कायम आहेत. याबाबत कडक निर्देश दिले आहेत. लोकायुक्तांकडील प्रकरणे, न्यायालयातील प्रकरणे, याबाबत कामांमध्ये अनियमितता आढळून आलेली आहे. त्याची पूर्तता करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. यासह जि.प.सदस्यांना करण्यात आलेले नियमबाह्य खाते वाटपाबाबत शासनस्तरावर चौकशीचा प्रस्ताव पाठवला असल्याचेही माने यांनी सांगितले. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर व अन्य अधिकारी उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...