आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समर्थ रामदास स्वामी पुस्तक अभ्यासक्रमातून रद्द, संभाजी महाराजांबद्दल करण्यात आले होते आक्षेपार्ह लिखाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - छत्रपती संभाजी महाराजांविषयी बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्यामुळे डॉ. शुभा साठे लिखित 'समर्थ श्री रामदास स्वामी' हे पुस्तक विद्यार्थ्यांच्या हाती न देता, त्याच्या प्रती मुख्याध्यापकांनी ताब्यात घ्याव्यात. यासंदर्भात इतिहासतज्ज्ञांची समिती नेमावी, असे आदेश शनिवारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे (विद्या प्राधिकरण) उपसंचालक (समन्वय) विकास गरड यांनी दिले. 


एकभाषिक पूरक वाचन पुस्तक योजनेअंतर्गत (सर्व शिक्षा अभियान) पुरवण्यात आलेल्या पुस्तकांपैकी नागपूर येथील लाखे प्रकाशनाच्या 'समर्थ श्री रामदास स्वामी' या पुस्तकाच्या बाबतीत उपरोक्त आदेश देण्यात आले आहेत. या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांविषयी अवमानकारक उल्लेख असल्याचा आक्षेप संभाजी ब्रिगेडने घेतला होता. त्यावर इतिहासतज्ज्ञांची समिती नेमून शासन स्तरावरून पुढील आदेश होईपर्यंत हे पुस्तक विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात येऊ नये, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. 


हे पुस्तक अभ्यासक्रमातून रद्द करावे, दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी ब्रिगेडतर्फे करण्यात आली आहे. दरम्यान, संत तुकाराम महाराज यांच्याबद्दलही एका पुस्तकात आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आला. 

बातम्या आणखी आहेत...