आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त श्रीपाद छिंदम निवडणुकीच्या रिंगणात:नगर महापालिकेसाठी अपक्ष अर्ज दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- अहमदनगरचा माजी उपमहापाैर व छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करणारा भाजपचा पूर्वाश्रमीचा नेता श्रीपाद छिंदम महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरला अाहे. वादात अडकल्यामुळे छिंदमला यंदा काेणीही उमेदवारी दिली नाही, तरी त्याने प्रभाग ९ क मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला अाहे. 


महानगर महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग अाला अाहे. सुटी वगळता अवघे तीन दिवस उरले असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी वाढणार आहे. २० नोव्हेंबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना गती आली आहे. शिवसेना- भाजपमध्ये युती अाणि दाेन्ही काँग्रेसमधील आघाडीचा घोळ अजूनही कायम असल्याने अनेक उमेदवार संभ्रमात आहेत. शिवसेनेने आतापर्यंत ३२ जणांची यादी प्रसिद्ध केली असून तिसरी यादी प्रतीक्षेत आहे. दुसरीकडे भाजपनेही १५ उमेदवारांची यादी जाहीर केली. राष्ट्रवादी व काँग्रेसकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली नाही.

 

मातब्बर उमेदवारांची तिकिटे निश्चित मानली जात आहेत. आतापर्यंत सुमारे ३२९ इच्छुकांनी ऑनलाइन नोंद केली असून २९ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, शिवाजी महाराजांबद्दल  आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर छिंदम आता निवडणून येतो की याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले  आहे.

 

भारिप-एमअायएम अाघाडी देणार ६८ उमेदवार  
राज्यात नव्याने अाकाराला अालेल्या एमअायएम व भारिप- बहुजन महासंघाची युती नगरच्या निवडणुकीतही उतरणार अाहे. त्यांनी ओबीसी सेवा संघ, बारा बलुतेदार महासंघ आदी पक्षांनाही साेबत घेण्याची तयारी दर्शवली अाहे. एकूण ६८ जागा ही अाघाडी लढवणार असून  उमेदवारांची पहिली यादी शनिवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...